Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

राज्यापालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाहीत;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

 राज्यापालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाहीत;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मुंबई प्रतिनिधी   : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आ...

 राज्यापालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाहीत;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

राज्यापालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाहीत;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई प्रतिनिधी  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबाबत केलेल्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये ते म्हटले आहे की, राज्यापालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाहीत. महाराष्ट्रात मराठी माणसाचं योगदान उल्लेखनीय आहे. राज्यापालांच्याही मनात मराठी माणासाबद्दल आदर आहे, असं फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

pitambari


मुंबईसह देशाच्या विकासात मराठी माणसाचं मोठं योगदान आहे. उद्योगाच्या क्षेत्रात देखील मराठी माणसाचं योगदान उल्लेखनीय आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानावर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे आज दुपारी १ वाजता आपल्या निवासस्थान मातोश्रीवर पत्रकार परिषद घेणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. "राज्यपाल महोदयांच्या बेताल विधानाचा समाचार घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषज आज दुपारी मातोश्री येथे १ वाजता", असं ट्वीट राऊतांनी केलं आहे.

pitambari


या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाचं योगदान सर्वाधिक आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली याचा मला अभिमान वाटतो, असे राज्यपालांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. आता राज्यपालांच्या या स्पष्टीकरणानंतर तरी हा वाद शांत होणार का, हे पाहावे लागेल.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place