Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

प्रसाद खांडेकरची दिग्दर्शकीय इनिंग ‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न

प्रसाद खांडेकरची दिग्दर्शकीय इनिंग ‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न मुंबई प्रतिनिधी - गणेश तळेकर : आपल्या बहारदार सादरीकरणाने प्रे...

प्रसाद खांडेकरची दिग्दर्शकीय इनिंग ‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न

प्रसाद खांडेकरची दिग्दर्शकीय इनिंग ‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न

मुंबई प्रतिनिधी - गणेश तळेकर : आपल्या बहारदार सादरीकरणाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा हास्यजत्रेतील कलाकार प्रसाद खांडेकर आता दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसलेला पहायला मिळणार आहे. ‘एकदा येऊन तर बघा’ अशा शीर्षकाच्या धमाल चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकर करीत आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला असून त्याच्या चित्रीकरणाला कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात सुरुवात झाली आहे. गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, नम्रता संभेराव, रसिका वेंगुर्लेकर आदि कलाकार या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहेत.

sonai ghee


‘कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रोडक्शन्स’ आणि ‘एस आर एन्टरप्रायजर्स’ यांच्या वतीने नुकतीच सात मराठी चित्रपटांची घोषणा करण्यात आली होती त्यामध्ये ‘एकदा येऊन तर बघा…रिटर्न जाणारच नाही’ या प्रसादच्या सिनेमाचीही घोषणा करण्यात आली होती. कॅलिडोस्कोप’चे पारितोष पेंटर आणि ‘एस आर एन्टरप्रायजर्स’चे राजेश कुमार मोहंती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

sonai pashu aahar


या मुहूर्तप्रसंगी निर्माते परितोष पेंटर, दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांच्यासोबत चित्रपटातील कलाकार आणि ऑनलाइन निर्माते सेजल पेंटर आणि मंगेश रामचंद्र जगताप उपस्थित होते.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place