Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

झी टॉकीजच्या चित्ररथाला विठूभक्तांचा उत्तम प्रतिसाद; विट्ठल रखुमाईच्या दर्शनाची भक्तांना मिळतेय अनुभूती.

  झी टॉकीजच्या चित्ररथाला विठूभक्तांचा उत्तम प्रतिसाद; विट्ठल रखुमाईच्या दर्शनाची भक्तांना मिळतेय अनुभूती. मुंबई प्रतिनिधी - गणेश तळेकर : आष...

 झी टॉकीजच्या चित्ररथाला विठूभक्तांचा उत्तम प्रतिसाद; विट्ठल रखुमाईच्या दर्शनाची भक्तांना मिळतेय अनुभूती.

झी टॉकीजच्या चित्ररथाला विठूभक्तांचा उत्तम प्रतिसाद; विट्ठल रखुमाईच्या दर्शनाची भक्तांना मिळतेय अनुभूती

मुंबई प्रतिनिधी - गणेश तळेकर : आषाढी एकादशी म्हटलं की आपल्याला आठवते पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करणारी पंढरीची वारी आणि त्यात सहभागी झालेले लाखो वारकरी. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनातील सर्वव्यापी आनंद सोहळाच... हा आनंद अधिक वृद्धिगंत करण्यासाठी झी टॉकीजने विट्ठल रखुमाईची भव्य मूर्ती असलेला आकर्षक चित्ररथ वारी मार्गक्रमण करीत असलेल्या ठिकाणी नेत भाविकांना विट्ठल रखुमाईच्या अखंड दर्शनाचा लाभ उपलब्ध करून दिला. झी टॉकीजच्या या संकल्पनेला आणि चित्ररथाला भक्तांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय.

chaudhari yatra


पंढरपूरच्या आनंदवारी सोहळ्याची आणि विठुरायाच्या दर्शनाची अनुभूती भक्तांना सहजी मिळावी यासाठी झी  टॉकीजने केलेल्या अनोख्या कल्पनेचे भक्तांनी चांगलेच स्वागत केले. वारीच्या मार्गावरील वेगवेगळ्या शहरांतून मार्गक्रमण करणारा पंढरपूरच्या विट्ठल मंदिराच्या स्वरूपातील हा चित्ररथ आम्हाला साक्षात श्री विट्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील गाभाऱ्याची अनुभूती देत असल्याचे भक्तगण सांगतायेत. १० फुटाची ही मूर्ती प्रत्यक्ष विठुराया भेटल्याची प्रचिती देत असल्याचे सांगत सगळे भक्त या चित्ररथाला पाहून भावुक झाल्याचे पहायला मिळतायेत.

झी टॉकीजच्या चित्ररथाला विठूभक्तांचा उत्तम प्रतिसाद; विट्ठल रखुमाईच्या दर्शनाची भक्तांना मिळतेय अनुभूती


आपली संस्कृती, व्रतवैकल्ये, सणउत्सव आणि लोकरंजन यांचं खूप जवळचं नातं आहे. याच विचाराने आम्ही चित्ररथाची संकल्पना राबवली आणि तिला उत्तम प्रतिसाद मिळाला. गेली पाच वर्षे सातत्याने भक्ती आणि प्रबोधनाचा आगळा मेळ साधत ‘गजर कीर्तनाचा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही हा वसा जपला असल्याचे झीच्या मराठी मुव्ही क्लस्टरचे चीफ चॅनेल ऑफिसर श्री. बवेश जानवलेकर सांगतात.

pitambari


प्रेक्षकही या कार्यक्रमाला भरभरून प्रेम देतायेत. त्यांच्या प्रतिक्रियांमधून त्यांनी कार्यक्रमाप्रती आपलं प्रेम व्यक्त केलं  आहे. वर्ध्याच्या देवळी येथील रोशनी कोपरकर सांगतात, ‘आम्ही ‘मनमंदिरा’ आणि ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ हा कार्यक्रम नियमित पाहत असतो. हे कार्यक्रम पाहून मनाला समाधान वाटतं आणि नवीन काही अनुभवायला मिळतं. हे कार्यक्रम असेच सुरू रहावेत. माझ्या परिवाराच्या वतीने झी टॉकीजचे यासाठी मनापासून आभार मानते. ‘मनमंदिरा’ आणि ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ हा कार्यक्रम आम्हाला खुप आवडतो. आम्ही दररोज घरात अगदी प्रसन्न मनाने देवाचा हरीनामाचा गजर करत या कार्यक्रमाचा आस्वाद घेत असल्याचे थेरगाव-पिंपरी चिंचवडचे कुणाल दिलीप बारणे आवर्जून सांगतात.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place