Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

धनुष्यबाण कोणाकडे जाणार? यावर राजकीय चर्चा रंगली असताना; उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मांडले महत्त्वाचे मुद्दे...

धनुष्यबाण कोणाकडे जाणार? यावर राजकीय चर्चा रंगली असताना; उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मांडले महत्त्वाचे मुद्दे... मुंबई प्रतिनिधी  : माजी...

धनुष्यबाण कोणाकडे जाणार? यावर राजकीय चर्चा रंगली असताना; उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मांडले महत्त्वाचे मुद्दे...

धनुष्यबाण कोणाकडे जाणार? यावर राजकीय चर्चा रंगली असताना; उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मांडले महत्त्वाचे मुद्दे...

मुंबई प्रतिनिधी  : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटाची बंडखोरी, शिवसेना, धनुष्यबाण आणि त्यांना झालेला त्रास या सगळ्यावर त्यांनी आपली मतं मांडली. आषाढी एकादशी दोन दिवसांवर आली आहे. आषाढीला पंढरपूरला येण्याचं वारकऱ्यांचं निमंत्रण मला आलं. पण मी पांडूरंगाच्या दर्शनासाठी नंतर जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सध्या धनुष्यबाण कोणाकडे जाणार? यावर राजकीय चर्चा रंगली असताना त्यावरही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.
chaudhari yatra


'शिवसैनिकांवर दडपण वाढेल असं मी काही बोलणार नाही. शिवसैनिकांच्या भावना दाटू आल्या आहेत. धनुष्यबाण शिवेसेनेपासून कुणीही हिरावू शकत नाही. माणसांची चिन्हही पाहिली जातात, नवीन चिन्हाचा विचार करण्याची गरज नाही' असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी खडसावून सांगितलं.

pitambari


उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...

- सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. माशाच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत. वाईट मलाही वाटलं, भावना मलाही आहेत. पण त्या मी बोलू शकत नाही.

- मी माझ्या सैनिकांवर दडपण वाढेल असं बोलत राहिलो तर योग्य नाही. दडपण हलकं करण माझं काम

- मला जो त्रास झाला तो कोणाला झाला नसेल. अडीच वर्षावरील आमचं प्रेम कुठे गेलं?

- शिवसेनेच्या चिन्हाबाबत चर्चा सुरु आहे. धनुष्यबाण कोणीही घेऊ शकत नाही. कायद्याच्यादृष्टीने बघितलं तर धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ती चिंता सोडा.

- सूरतहून बोलण्यापेक्षा 'सूरत' दाखवून बोलायचं होतं, अशा शब्दात ठाकरेंनी आमदारांना टोमणाही लगावला.

- माणसाची चिन्हही लोक बघतात, लोक विचार करून मतदान करतात. मागच्या काळात काय झालं हे सांगितलं. याचा अर्थ चिन्हा सोडायाचं असं नाही मी घटना कायदे तज्ंज्ञाशी बोलून तुम्हाला सांगतोय

- एकही महापालिका अस्तित्त्वात नाहीत, त्यांचे कार्य़कर्ते असतील, त्यांच्यामुळे मी साध्या शिवसैनिकांना डावलंलं..

- शिवसेनेने कोणाची पार्श्वभूमी न पाहता साध्या लोकांना मोठं केलं. मोठी झालेली लोक गेली, पण ज्यांनी मोठं केलं ती साधी माणसं शिवसेनेसोबतत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या भवित्यव्याला धोका नाही

- शिवसेना गोष्ट नाही कोणी घेऊन पळत सुटला.

आमचाही एकच आमदार होता, तेच पक्ष सोडून गेले म्हणजे पक्ष संपला का १५० १०० गेले आमदार तरी पक्ष संपू शकत नाही. पक्ष कायम राहतो.

- लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. विधिमंडळ पक्ष आणि नोंदणीकृत पक्ष वेगळा आहे. त्यामुळे शिवसेनेला काहीही होणार नाही.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place