Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यात दरड कोसळली ; सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला.

  मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यात दरड कोसळली ; सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला. सातारा प्रतिनिधी : मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यात द...

 मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यात दरड कोसळली ; सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला.

मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यात दरड कोसळली ; सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला

सातारा प्रतिनिधी : मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यात दरड कोसळल्याची माहिती बातमी समोर आली आहे. सातऱ्यात सज्जनगड जवळ मोठी दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. सातारा ठोसेघर रस्त्यावर संबंधित घटना घडली आहे. या घटनेमुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळल्यांनतर घटनास्थळी असलेल्या वाहनचालकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. पण सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेतून काही वाहनचालक बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या भागातही घटना घडली आहे तर तेथे गेल्या तीन दिवसांपासून दरड कोसळत असल्याचं देखील समोर आलं आहे.

chaudhri yatra


राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच मुंबई-गोवा महामार्गावर परशूराम घाटात दरड कोसळल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यानंतर आता साताऱ्याच्या सज्जनगडावर मोठी दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. विसेष म्हणजे राज्यातील विविध भागात अशा दरड कोसळण्याच्या बातम्या समोर येत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना समोर येत असतात. गेल्यावर्षी तर दरड कोसळल्यामुळे अनेक ठिकाणी मोठी जीवितहानी देखील झाली होती.साताऱ्याच्या पश्चिम भागातील जनजीवर संततधार पावसामुळे विस्कळीत झालं आहे. तर साताऱ्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून त्या परिसरात अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या पेरण्याही झालेल्या नाहीयेत.
राज्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place