Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

साईबाबांच्या शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह; भाविकांसाठी खास १२ टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद.

 साईबाबांच्या शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह; भाविकांसाठी खास १२ टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद. अहमदनगर प्रतिनिधी : सबका मालिक एक असा संदे...

 साईबाबांच्या शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह; भाविकांसाठी खास १२ टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद.

साईबाबांच्या शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह; भाविकांसाठी खास १२ टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद

अहमदनगर प्रतिनिधी : सबका मालिक एक असा संदेश देणा-या साईबाबांच्या शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह दिसून येत आहे. शिर्डी माझे पंढरपूर ही भावना घेऊन हजारो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. आषाढी एकादशी निमित्ताने साई प्रसादालयात भाविकांसाठी खास १२ टन साहित्य वापरून साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद बनवण्यात आलाय. तर, राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह दिसून आला.

chaudhari yatra


'शिर्डी माझे पंढरपूर' आरती संपन्न

आज आषाढी एकादशी निमित्त शिर्डीत साईदर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी साई संस्थानकडून ११ प्रसादालयात खास साबुदाणा खिचडीचा प्रसाद देण्यात आला आहे. तब्बल ते १२ टन साहित्याचा वापर यासाठी करण्यात आला आहे. तर साई समाधीवर विठ्ठलाची प्रतिमा ठेवण्यात आली. साई मुर्तीला करोडो रुपयांच्या सोन्याच्या अलंकार आणि तुळशीमाळांचा साजसुद्धा चढवण्यात आला आहे. आषाढी एकादशी निमित्ताने कर्नाटक‍ येथील देणगीदार साईभक्‍त एस. प्रकाश यांच्‍या देणगीतून मंदिर व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली आहे. पंढरपूर प्रमाणे साई बाबांना विठ्ठल स्वरूप मानत शिर्डीत दाखल झालेल्या साई भक्तांच्या उपस्थितीत 'शिर्डी माझे पंढरपूर' ही आरती संपन्न झाली.

pitambari


११ ते १२ टनाच्या साहित्यापासून खिचडी

खिचडीचा महाप्रसाद बनवण्यासाठी ११ ते १२ टन उपवासाच्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. यात साबुदाणा ७ हजार किलो, शेंगदाणे १ हजार किलो, बटाटा ३ हजार किलो यासह साखर, मिरची असे साहित्य हा महाखिचडी प्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात आले आहे. शिर्डी पंचक्रोशीतील स्थानिक भाविक आवर्जुन या प्रसादरुपी खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. सोबत देशभरातुन आलेल्या भाविकांनाही प्रसाद भोजनात दररोज दिल्या जाणाऱ्या भाजी, पोळी, वरण- भाताऐवजी साबुदाणा खिचडी मिळत असल्याने भाविकांनीही समाधान व्यक्त केले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place