Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

बायकोला परत घरी आणण्यासाठी दारूच्या नशेत मोबाइल टॉवरवर मुक्काम ठोकला.

 बायकोला परत घरी आणण्यासाठी दारूच्या नशेत मोबाइल टॉवरवर मुक्काम ठोकला. जालना प्रतिनिधी : भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील माइलस्टोन ठरले...

 बायकोला परत घरी आणण्यासाठी दारूच्या नशेत मोबाइल टॉवरवर मुक्काम ठोकला.

बायकोला परत घरी आणण्यासाठी दारूच्या नशेत मोबाइल टॉवरवर मुक्काम ठोकला

जालना प्रतिनिधी : भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील माइलस्टोन ठरलेला 'शोले' चित्रपटातील अभिनेता धर्मेंद्र यांनी पाण्याच्या टाकीवरून केलेला सीन अनेकदा प्रत्यक्ष रियल लाईफमध्ये पाहायला मिळतो. अशीच घटना जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील दाभाडी गावात घडली. ही घटना आणि त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. घटना जाणून घेतल्यानंतर तुम्हाला टेन्शन तर येईल पण हसू रोखता येणार नाही.

pitambari


गणपत बकाल असे दारू पिऊन मोबाइल टॉवरवर चढणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने चार तास दारूच्या नशेत मोबाइल टॉवरवर मुक्काम ठोकल्याने घटनास्थळी जमा झालेल्या नागरीकांमध्ये घबराट पसरली होती. सर्व यंत्रणांनी प्रयत्न करूनही हा तरुण खाली आला नाही. अखेर स्वतःहून चार तासानंतर तो टॉवरवरून खाली आल्याने उपस्थित नागरीकांनी सुटकेचा निश्वास टाकला.दारूच्या नशेत गणपत बकाल हा चार वाजेच्या सुमारास गावातीलच मोबाइल टॉवरवर चढला. गावातील लोकांना त्याने मला घरकुल पाहिजे. माझी बायको मला सोडून माहेरी गेलेली आहे, तिला माझ्याकडे परत आणा, अशी मागणी केली. गावकऱ्यांनी त्याला टॉवर वरून खाली उतरण्यासाठी खुप प्रयत्न केले. पोलिसांचा फौजफाटा देखील घटनास्थळी दाखल झाला. मात्र पोलिसांकडून ही तो खाली आला नाही.

pitambari


त्यानंतर मात्र अग्निशमन दलाचे पथक बोलवण्यात आले तेही त्याच्यासमोर हतबल झाले. गणपत हा दारूच्या नशेत असल्याने अनेकांनी त्याची मजा घेतली. "तुला आमदार करतो, खाली उतर" अशी गळ घातली, पण तरीही तो खाली उतरण्यास तयार झाला नाही. तब्बल ४ तासाने तो टॉवर खाली उतरला. त्यानंतर बदनापूर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place