Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री खुर्चीवर बसवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे

  फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री खुर्चीवर बसवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे मुंबई  प्रतिनिधी : एकनाथ शिंदे (Eknath Shinde...

 फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री खुर्चीवर बसवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे

फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री खुर्चीवर बसवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे
मुंबई  प्रतिनिधी : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सकाळी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन त्यांनी कामकाजाला प्रारंभ केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. फडणवीसांनी शिंदेंना खुर्चीवर बसवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.
chudhari yatra


एकनाथ शिंदे यांच्या रुपाने सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवून शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न भाजप प्रत्यक्षात उतरवत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं.खरं तर शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतु आज प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले. तसेच त्यांनी लगेचच विविध विषयांवरील बैठकांना उपस्थिती देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
कुटुंबीयांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला
pitambari


यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश उपस्थित होते. यावेळी काही आमदारांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांना सदिच्छा दिल्या. यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालयात प्रवेश केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place