राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या वतीने १५ ऑगस्ट २०२२ स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव जल्लोषात साजरा.... मुंबई (प्रतिनिधी) : साला...
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या वतीने १५ ऑगस्ट २०२२ स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव जल्लोषात साजरा....
मुंबई (प्रतिनिधी) : सालाबाद प्रमाणे यावर्षी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश व नाका सेलच्या वतीनेच्या मानखुर्द लल्लुभाई कंपाऊंड येथे स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव अतिशय जल्लोषांमध्ये साजरा करण्यात आला.... पक्षाचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख तथा मुंबई प्रदेश महासचिव मा. सचिन भाऊ नांगरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर तिरंगा झेंड्याला स्थानिक शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या वतीने राष्ट्रगीत सादर करण्यात आले. तसेच कवायत द्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. देशभक्ती गीत, नृत्य मनोरंजनात्मक विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील पक्षाचे मार्फत करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रामुख्याने पक्षाचे मानखुर्द शिवाजीनगर तालुका अध्यक्ष विश्वास कांबळे, नाका सेल मुंबई अध्यक्ष सागर पिल्ले, नाका सेल १४३-वार्ड अध्यक्ष सजंय तेलूरे, नाका सेल चे महाराष्ट्र नगर येथील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, महिला व ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत