विरारच्या विवा महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भव्य प्रभातफेरीचे आयोजन विरार (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्स...
विरारच्या विवा महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भव्य प्रभातफेरीचे आयोजन
विरार (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' अभियानाच्या अंतर्गत विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयातर्फे भव्य प्रभातफेरी १३ ऑगस्ट रोजी काढण्यात आली.
प्रभातफेरी सुरू करण्याआधी ध्वजवंदन करण्यात आले. त्यावेळी तिरंग्याविषयी आणि त्याचा अवमान होऊ नये यासंदर्भात माहिती देण्यात आली. यानंतर अतिशय उत्साहात ९ वाजल्यापासून सुरू झालेल्या प्रभातफेरीमध्ये महाविद्यालयाचे जवळपास २००० हुन अधिक विद्यार्थी आणि ३५० प्राध्यापक तसेच इतर कर्मचारीवर्ग सुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. "भारत माता की जय, वंदे मातरम" च्या घोषणांनी सर्व विरार परिसर दणाणून गेला होता. संपूर्ण विरार शहरात त्यामुळे देशभक्तीमय वातावरण तयार झाले होते. प्रभात फेरीमध्ये ढोल पथक, लेझीम पथक सहभागी झाले होते. काही विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेमध्ये तर काही स्वातंत्र्यसैनिकांचा पेहराव करुन आले होते. वेगवेगळ्या सामाजिक समस्यांवर आधारित पोस्टर्स विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून प्रभातफेरीमध्ये प्रदर्शन करण्यात आले होते.असे भव्य कार्यक्रम करण्यासाठी संस्थेच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीचे नेहमीच सहकार्य असते.
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग समिती आणि सर्व शिक्षक,सर्व महाविद्यालयातील कर्मचारी वर्ग, आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला....






कोणत्याही टिप्पण्या नाहीत