पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर युवक संघटनेच्या वतीने सत्कार समारंभ व कौटुंबिक स्नेह मेळावाचे आयोजन.... पुणे पिंपरी (प्रतिनिधी) दत्ता ...
पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर युवक संघटनेच्या वतीने सत्कार समारंभ व कौटुंबिक स्नेह मेळावाचे आयोजन....
पुणे पिंपरी (प्रतिनिधी) दत्ता गोडसे : पुणे - सातारा- कोल्हापूर सांगली- सोलापूर युवक संघटनेच्या वतीने दहावी व बारावी मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच कला क्रीडा सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात समाजोपयोगी उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आणि कौटुंबिक स्नेह मेळावा दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजी सायं. ५ वा. खंडोबा मंदिर सांस्कृतिक भवन, खंडोबा माळ, आकुर्डी चौक, जुना पुना मार्ग आकुर्डी पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. मा. लक्ष्मण जगताप - आमदार चिंचवड विधानसभा, मा. शशिकांत शिंदे - आमदार विधानपरिषद, मा.पै. महेश दादा लांडगे - आमदार भोसरी विधानसभा, मा. अण्णा बनसोडे - आमदार पिंपरी विधानसभा, आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमांमध्ये सातारा भूषण, सांगली भूषण, कोल्हापूर भूषण, सोलापूर भूषण, या पुस्तकाचे वितरण देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला असंख्य लोकांनी उपस्थित रहावे अशे आव्हान देखील संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत