सोशल मीडियावरही कलाकारांचा वेडेपणा चाहत्यांना आवडत असतो. असाच वेडेपणा केला अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिनेही. मुंबई प्रतिनिधी - कलाकार वेड...
सोशल मीडियावरही कलाकारांचा वेडेपणा चाहत्यांना आवडत असतो. असाच वेडेपणा केला अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिनेही.
मुंबई प्रतिनिधी - कलाकार वेडे असतात असं म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. पण हा वेडेपणा अभिनयासाठी आणि काहीतरी कलाकृती घडवण्यासाठी ते करत असतात. भूमिका सकसपणे साकार करण्यासाठी कलाकार जो वेडेपणा करतात तो तर महत्वाचा असतोच पण सोशल मीडियावरही कलाकारांचा वेडेपणा चाहत्यांना आवडत असतो. असाच वेडेपणा अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिनेही केला आहे.
प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असलेल्या कलाकारांपैकी एक आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील सेटवरील धमालमस्तीचे व्हिडिओही ती नेहमी शेअर करत असते. आता तिने एक असा व्हिडिओ शेअर केला आहे की तो पाहून प्रार्थना खरच वेडी आहे असं म्हटल्याशिवाय राहणार नाही.
कलाकार नेहमीच सोशल मीडियावर ट्रेंडिंग व्हिडिओ करत चाहत्यांची पसंती मिळवत असतात. सध्या इन्स्टाग्रामवर वेव्ह या इफेक्टमध्ये व्हिडिओ आणि रिल्स बनवण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिलाही या ट्रेंडवर रिल्स करण्याचा मोह आवरला नाही. या व्हिडिओमध्ये प्रार्थना आणि तिचा नवरा अभिषेक जावकर दोघंही दिसत आहेत.
ट्रॅक सूट लुकमध्ये प्रार्थनाने नवऱ्यासोबत हा व्हिडिओ केला आहे. सध्याच्या लोकप्रिय वेव्ह इफेक्टवर प्रार्थना अभिषेकसोबत खूपच मजेशीर दिसत आहे. या व्हिडिओसोबत तू होगा जरा पागल, तुने मुझको है चुना हे गाणं लावलं आहे. गंमत म्हणजे शूट करत असताना वेव्ह फिल्टर लावल्याचं तिने नवरा अभिषेकला सांगितलं नव्हतं.
काही दिवसांपूर्वी प्रार्थना तिच्या नवऱ्यासोबत लंडनला फिरायला गेली होती. लंडनमधील अनेक रिल्स आणि व्हिडिओ प्रार्थनाने शेअर केले होते. सोशल मीडियावर प्रार्थनाच्या व्हिडिओंची चाहते वाट बघत असतात. शूटिंगच्या सेटवर प्रार्थना एकटी किंवा सहकलाकारांसोबत व्हिडिओ शेअर करत असतेच.
प्रार्थनाचा नवरा अभिषेक हा निर्मिती क्षेत्रात असूनही सोशल मीडियापासून लांब असल्याचं प्रार्थनानं एकदा सांगितलं होतं. त्यामुळे प्रार्थनाच्या व्हिडिओपासून अभिषेक जरा लांबच असतो. पण प्रार्थनाचा व्हिडिओ शूट करून ते शेअर करण्याचा वेडेपणा इतका जास्त आहे की काय करायचं ते कर असं म्हणत आता अभिषेकनेही हात टेकले असल्याचं प्रार्थना सांगते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत