राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मुंबई प्रदेश कार्यकर्ते बैठक कलानगर बांद्रा येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न...
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मुंबई प्रदेश कार्यकर्ते बैठक कलानगर बांद्रा येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
मुंबई प्रतिनिधी : राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली बांद्रा कलानगर येथे पक्षाची मुंबई प्रदेशची बैठक संपन्न झाली. त्या बैठकीत दिनांक ११ सप्टेंबर २२ रोजी पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन डॉ. शिरोडकर सभागृह, के.ई.एम हॉस्पिटल शेजारी परेल मुंबई येथे आयोजित करण्यात आले असून, राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात जोमाने सुरू असून, दररोज युवक, युवती, महिला, ज्येष्ठ सर्व क्षेत्रातील मान्यवर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात सामील होत आहे.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी मुंबई प्रदेश सचिव पदी भार दार व्यक्तिमत्त्व, मनमिळावू, डॅशिंग बाबासाहेब खरात यांची निवड जाहिर केली. संपूर्ण मुंबई प्रदेश मध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष जोमाने वाटचाल करेल असे आश्वासन बाबासाहेब खरात यांनी दिले. बाबासाहेब खरात यांचा जनसंपर्क अत्यंत दांडगा असून मुंबई प्रदेश राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची ताकद अधिक मजबूत करणार असे त्यांनी नियुक्ती दरम्यान सांगितले. तसेच बांद्रा येथे दि. १ ऑगस्ट २२ रोजी मुंबई प्रदेशचे भव्य कार्यालय उद्घाटन करण्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
या बैठकीला राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयराज पगारे, केंद्रिय महासचिव पोपटराव सोनवणे, मुंबई प्रदेशाध्यक्ष अशोकराव भोगले, युवा नेतृत्व बिपीनभाई कटारे, युवा नेते प्रशांतभाऊ कटारे, महाराष्ट्र राज्य जनसंपर्क प्रमुख तथा मुंबई महासचिव सचिनभाऊ नांगरे, मुंबई प्रदेश सचिव बाबासाहेब खरात, मुंबई उपाध्यक्ष मलंग भाई शेख, नाका सेल मुंबई अध्यक्ष सागर भाई पिल्ले, रिक्षा युनियन मुंबई अध्यक्ष महेमुद भाई शेख, उत्तर मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष रमेश पारवे कांबळे, आदी पदाधिकारी / कार्यकर्ते उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत