कल्याणात प्रज्ञा भावे शाळेकडून विद्यार्थ्यांचे ढोलताशे लेझिम पथकांच्या गजरात स्वागत कल्याण प्रतिनिधी - Jun 15, 2022 जून महिना उजाडला की व...
कल्याणात प्रज्ञा भावे शाळेकडून विद्यार्थ्यांचे ढोलताशे लेझिम पथकांच्या गजरात स्वागत
कल्याण प्रतिनिधी - Jun 15, 2022 जून महिना उजाडला की विद्यार्थ्यांना वेध लागतात शाळेचे, दोन महिन्यांच्या सुट्टी नंतर कधी एकदा शाळेत जातोय, मित्र मैत्रीणीना भेटतोय, सुट्टीत केलेली मजा सांगतोय, एकत्र डबा खातोय असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं. शाळेचा पहिला दिवस म्हनजे नवीन युनिफॉर्म नवे मित्र ,नवे शिक्षक त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये एक उत्साह असतो. शाळा देखील पहिल्या दिवशी मुलांच्या किलबिलाटामुळे गजबजून जाते. मात्र कोरोनामुळे गेली शैक्षणिक वर्षातला पहिला दिवस दोन वर्ष विद्यार्थ्यांना हा दिवस अनुभवता आला नव्हता. शाळा देखील पहिल्या दिवसाच्या किलबिलाटाला मुकल्या होत्या. यंदा मात्र जवळपास दोन वर्षांनी शाळा यंदा पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झाल्यात. दोन वर्ष ऑनलाइनच्या गराड्यात अडकेलेले विद्यार्थी पहिल्यांदाच जून महिन्यात शाळेत आले. कल्याण पूर्वेकडील प्रज्ञा भावे शाळेने मुलांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. प्रवेशद्वार फुगे, फुलांनी सजवलले होते. लेझिम, ढोलताशांच्या गजरात पुष्प वृष्टी करत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
विद्यार्थ्यांना वही पेन देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह दिसून येत होता. तर पश्चिमेकडील बालक मंदिर शाळेत देखील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश उत्सव आयोजित करण्यात आला होता. बालक मंदिर शाळेत आज अनेक चिमुकल्यांचा पहिला दिवस होता. पहिल्यांदाच चिमुकले शाळेत आले होते. या मुलांच्या स्वागतासाठी शिक्षकांनी तयारी केली होती. या चिमुकल्यांचे रडणे, शिक्षकांचं समजावणं, मुलांचा किलबिलाट यामुळे शाळा दोन वर्षांनंतर गजबजून गेल्याचं दिसून आलं.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत