शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांची दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट. जालना प्रतिनिधी : शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांची ...
शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांची दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट.
जालना प्रतिनिधी : शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांची दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली असून ते लवकरच शिंदे गटात सामील होणार असल्याचे बातम्या येऊ लागल्या आहेत. मात्र, खुद्द आर्जुन खोतकर यांनी याबाबतच्या बातम्या म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत महाराष्ट्र सदनात माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समोरा-समोर भेट झाली. आमच्या दोघांमध्ये नमस्कार सुद्धा झाला. नमस्कार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मग मी नमस्कार सुद्धा करायचा नाही का?, पण माझ्या पक्षांतराच्या अफवा येऊ लागल्या, असे सांगत मी आयुष्यभर शिवसेनेतच राहणार असल्याचे शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट करत अफवांना पूर्णविराम दिला आहे.
दिल्लीत मी माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. तेथे मी चार दिवस होतो. दिल्लीत असताना महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझी समोरा-समोर भेट झाली. आम्ही एकमेकांना नमस्कार देखील केला, अशी माहिती शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी दिलीय. सोशल मीडियात अर्जुन खोतकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या अफवा होत्या. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक होतो आणि यापुढेही राहील असे सांगत आपण आयुष्यभर शिवसेनेतच राहणार असल्याचे खोतकर यांनी म्हटले आहे.नमस्कार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला भेटल्यानंतर मी त्यांना नमस्कार केला, असे सांगतानाच असा नमस्कार सुद्धा करायचा नाही का?, असा सवाल देखील खोतकर यांनी उपस्थित केला आहे.
सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्ता यांच्या मध्यस्तीने अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. त्यानंतर समाज माध्यमांवर देखील जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर हे दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले असून शिंदे गटात सामील होत असल्याच्या वावड्या उठल्या होत्या.साहजिकच मराठवाड्याचा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या जालन्यात या मुळे मोठी चर्चा रंगली होती.आज अर्जुन खोतकर यांनी या वावड्यांना पूर्णविराम दिला आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत