Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

अशोक पत्की, महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत कलाश्रमच्या अभियान सन्मानचा सुवर्ण महोत्सव

 अशोक पत्की, महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत  कलाश्रमच्या अभियान सन्मानचा सुवर्ण महोत्सव  मुंबई प्रतिनिधी - गणेश तळेकर :  स्वातंत्रसैनिक डॉ...

 अशोक पत्की, महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत  कलाश्रमच्या अभियान सन्मानचा सुवर्ण महोत्सव 

अशोक पत्की, महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत  कलाश्रमच्या अभियान सन्मानचा सुवर्ण महोत्सव
मुंबई प्रतिनिधी - गणेश तळेकर :  स्वातंत्रसैनिक डॉ.परशुराम पाटील कला केंद्राच्या वतीने 'कलाश्रम' ही संस्था शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यकर्ते. या संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला 'अभियान सन्मान' या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या महिन्यात होणारा  हा कार्यक्रम संस्थेचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम आहे. तो  रविवार, २५ सप्टेंबर २०२२ या दिवशी दोन सत्रात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, मीनी नाट्यगृह, प्रभादेवी येथे साजरा केला जाणार आहे.

pitambari


 ३ वाजता होणाऱ्या पहिल्या सत्राचे प्रमुख पाहुणे संगीतकार, गीतकार अशोक पत्की तर दुसऱ्या सत्रात ६ वाजता होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर उपस्थित राहणार आहेत. पहिल्या सत्रात 'मनात तू काव्यात तू',  'द बिर्लाज्' ही दोन पुस्तके नंदकुमार पाटील लिखित, संपादीत तर जयश्री काटे यांचा 'जीवन लहरी' हा काव्यसंग्रह यावेळी प्रकाशित होणार आहे. 'मनात तू काव्यात तू'  हा काव्यसंग्रह असून या कार्यक्रमात एक अभिनव प्रयोग केला जाणार आहे. तो म्हणजे या पुस्तकात कवी म्हणून सहभागी असलेल्या कवींना प्रत्यक्ष रंगमंचावर कविता सादर करण्यासाठी निमंत्रित केले जाणार आहे.

pitambari


 संगीत, नृत्य, प्रकाशयोजना यांचा सुरेख संगम साधून कविता सादर केल्या जाणार आहेत.  विजया कदम, महेश कांबळे, समीक्षा पाटील यांची नृत्य अदा हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे. कविता सादरीकरणात अलका नाईक, शोभा गांगण, क्षितीजा साठे, आदित्य कदम, अमोल कशेळकर, नंदा बिरादार, दिपाली देशपांडे, विकास साटम, निर्मला देऊसकर, उद्देश गायकवाड, नंदा कोकाटे, वंदना माईन या कवींचा सहभाग आहे. भाग्यश्री कांबळी, युगंधरा वळसंगकर हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. शिवाय 'ध्वज रंग', मी पण वृत्तनिवेदक, वर्ष तिसरे या स्पर्धेचा  पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. दुसऱ्या सत्रात कुठल्याही साली पण सप्टेंबरमध्ये निधन झालेल्या प्रज्ञावंतांच्या नावाचा पुरस्कार त्याच क्षेत्रात कर्तुत्व सिद्ध करणाऱ्या गुणीजनांना दिला जातो. यावेळी दिवंगताच्या यादीत पत्रकार, साहित्यिक - अरुण साधू , कवी, गीतकार - वसंत बापट, निर्माते, अभिनेते - मच्छिंद्र कांबळी, अभिनेत्री, गायिका - आशालता वाबगावकर यांच्या नावाचा समावेश आहे.

pitambari


 पत्रकार - श्रीकांत बोजेवार, अभिनेता - दिगंबर नाईक, अभिनेत्री - वर्षा दांदळे,  शाहीर - दत्ता म्हात्रे यांना हे दखलपत्र देण्यात येणार आहे. या शिवाय या दखलपत्र प्राप्त गुणीजन  प्रत्यक्ष कलाकृती सादर करणार आहेत. दुसऱ्या सत्राचे हे खास आकर्षण असणार आहे. यानिमित्ताने आजवर 'अभिनय सन्मान ' या उपक्रमाचे सूत्रसंचालन केलेल्या  पंचवीस कलाकारांना दिवंगत आशालता आवटी यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने स्मृतिचिन्ह देऊन गौरवाकिंत करण्यात येणार आहे. हे सर्व पुरस्कार महेश मांजरेकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्ञानेश महाराव, रवींद्र आवटी, अजित पडवळ, किरण बिर्ला, सुहास कामत, दीपा फोंडगे, विद्या गायकवाड, जयवंत मालवणकर, सुभाष भागवत यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आहे. प्रसिद्धी माध्यमात जोमाने काम करणारे पत्रकार या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. मृण्मयी भजक सुत्रसंचलन तर दखलपत्र वाचनात विनोद घाटगे, पुनम चांदोरकर, प्रशांत अनासपुरे, अश्विनी पारकर यांचा सहभाग असणार आहे.  हा कार्यक्रम विनामूल्य असल्याचे कार्यक्रमाच्या संयोजिका नयना पराडकर -पाटील यांनी कळवलेले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place