राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सभासद नोंदणी अभियान गतिमान करा -अण्णासाहेब कटारे (राष्ट्रीय अध्यक्ष).... नाशिक (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय रिपब्लिकन ...
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सभासद नोंदणी अभियान गतिमान करा -अण्णासाहेब कटारे (राष्ट्रीय अध्यक्ष)....
नाशिक (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष पदाधिकारी/ कार्यकर्ता बैठक शासकीय विश्रामगृह नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी अण्णासाहेब कटारे यांनी बोलतांना सांगितले की संपूर्ण भारतात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष जोमाने वाटचाल करीत असून, दररोज असंख्य युवक -महिला- जेष्ठ दिग्गज नेते -कार्यकर्ते-विविध क्षेत्रातील मान्यवर पक्षात प्रवेश करीत आहे. या बैठकी दरम्यान देखील काही महिलांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आहे.
संपूर्ण राज्यात सभासद नोंदणी अभियान जोमाने सुरू असून नाशिक जिल्हयात देखील जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी असे आवाहन कटारे यांनी मार्गदर्शन करतांना कार्यकर्त्यांना केले.राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने सुरू असून सर्व समाज घटक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
या बैठकीस प्रामुख्याने (राष्ट्रीय प्रवक्ते) गिरीष अकोलकर सर, (राष्ट्रीय उपाध्यक्ष) विजयराज पगारे, (महाराष्ट्र प्रदेश महासचिव) ॲड.विजयजी पवार, (नाशिक जिल्हा अध्यक्ष विधी विभाग) अँड.युवराजजी देवरे, (नाशिक युवा जिल्हाध्यक्ष) जितू भाऊ बागुल, (महानगर प्रमुख महिला आघाडी नाशिक मीनाक्षीताई पवार, नेते दिलीप जी प्रधान, (नाशिकरोड शहर संघटक) आकाश जी गांगुर्डे,(सातपूर युवा आघाडी) धर्मराज पाईकराव, (आडगाव युवा नेते) मकरसिंग चीतोडिया, (सिडको महिला महासचिव) वृंदा ताई अहेर,(सिडको उपाध्यक्ष) सुवर्णा ताई जैतमल, (सातपूर महिला आघाडी) माया ताई पवार,(नाशिकरोड) जितेंद्र आहिरे, हरिभाऊ आव्हाड, अशोकसिंग चीतोडीया, प्रशांत कटारे आदी पदाधिकारी उपस्थित होते






कोणत्याही टिप्पण्या नाहीत