Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

संगीतकार अविनाश-विश्वजीत यांच्या कारकिर्दीची तपपूर्ती

संगीतकार अविनाश-विश्वजीत यांच्या कारकिर्दीची तपपूर्ती मुंबई प्रतिनिधी - गणेश तळेकर संगीत क्षेत्राच्या नभांगणात आज बरेच संगीतकाररूपी तारे चमक...

संगीतकार अविनाश-विश्वजीत यांच्या कारकिर्दीची तपपूर्ती

संगीतकार अविनाश-विश्वजीत यांच्या कारकिर्दीची तपपूर्ती


मुंबई प्रतिनिधी - गणेश तळेकर

संगीत क्षेत्राच्या नभांगणात आज बरेच संगीतकाररूपी तारे चमकत आहेत. नावीन्याचा ध्यास घेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या बऱ्याच संगीतकारांनी मनोरंजन विश्वात नाव कमावलं आहे. या यादीत सध्या आघाडीवर असलेली संगीतकार जोडी म्हणजे अविनाश-विश्वजीत.. २०१० मध्ये सिनेसृष्टीतील आपली कारकिर्द सुरू करणाऱ्या या जोडीनं अविरतपणे १२ वर्षे काम करून संगीतप्रेमींच्या मनावर आपल्या संगीताचा अमीट ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही कायम जमिनीवर राहून संगीताची सेवा करण्याचं ब्रीद जपत अविनाश-विश्वजीत यांनी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी मनोरंजन विश्वाला दिली आहेत.

संगीतकार अविनाश-विश्वजीत यांच्या कारकिर्दीची तपपूर्ती


'कधी तू रिमझिम झरणारी...', 'ओल्या सांज वेळी...', ‘ह्रदयात वाजे समथिंग...’ ही गाजलेली रोमँटिक गाणी आठवली की आपोआपच संगीतकार अविनाश-विश्वजीत यांची आठवण होते. रोमँटिक गाणी म्हणजे अविनाश-विश्वजीत हे समीकरण जणू तयार झालं, मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे' आणि 'सरसेनापती हंबीरराव' या दोन्ही  चित्रपटांच्या गाण्यांतून लोकसंगीताचा रांगडा बाज दाखवत वेगळी झलक रसिकांना दाखवून दिली आहे. मराठी बॉक्स ऑफिसवर तूफान गर्दी खेचणाऱ्या 'धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे' आणि 'सरसेनापती हंबीरराव' या दोन सुपरहिट मराठी चित्रपटांतील 'धर्मवीर'मधील 'असा हा धर्मवीर...' या टायटल साँगसह 'सरसेनापती हंबीरराव'मधील 'हंबीर तू, खंबीर तू...' हे गाणं रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. या दोन चित्रपटांच्या माध्यमातून पुन्हा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी झालेल्या अविनाश-विश्वजीत यांचे लवकरच आणखी काही महत्त्वपूर्ण चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place