एकनाथ शिंदेंचंं नाराजीनाट्य, ठाकरे सरकार संकटात; अपक्ष आमदारांचं महत्त्व वाढलं मुंबई प्रतिनिधी : महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेला एकनाथ श...
एकनाथ शिंदेंचंं नाराजीनाट्य, ठाकरे सरकार संकटात; अपक्ष आमदारांचं महत्त्व वाढलं
मुंबई प्रतिनिधी : महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेला एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं धोका निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे सेनेच्या ३५ आमदारांना घेऊन सूरतमध्ये गेले आहेत. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि रमेश फाटक यांनी सूरतच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. राज्यात सुरु झालेल्या सत्तानाट्यामुळं छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचं महत्त्व पुन्हा वाढलं आहे. राज्यात छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची संख्या २९ आहेत. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीनंतर छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत