राज्यात सत्तासंघर्षाचं सावट असताना ठाकरे सरकारनं जनहिताची कामं सुरुचं पोलीस भरती लवकरच, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा मुंबई प्रतिनिधी : राज्य...
राज्यात सत्तासंघर्षाचं सावट असताना ठाकरे सरकारनं जनहिताची कामं सुरुचं पोलीस भरती लवकरच, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा
मुंबई प्रतिनिधी : राज्यात सत्तासंघर्षाचं सावट असताना ठाकरे सरकारनं जनहिताची कामं सुरुचं ठेवली आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने दोन टप्प्यामध्ये पोलिस भरती करायचं ठरवलं होतं. पहिली टप्प्यातील ५ हजार पोलिसांची भरती झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ७ हजार २३१ पोलिसांची भरती करण्यासंदर्भात नियमामध्ये बदल करणं गरजेचं होतं. राज्याच्या पोलीस महासंचालकांना पोलीस भरती त्वरीत सुरु करावी, असे आदेश देण्यात आले आहेत, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
भरती संदर्भात नियमात बदल
राज्यात लवकरच पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबविणार, जवळपास ७ हजार २३१ पदे भरली जाणार असून या प्रक्रियेसाठी पहिल्यांदाच शारीरिक चाचणी होणार असल्याचे गृह विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने दोन टप्प्यामध्ये पोलिस भरती करायचं ठरवलं होतं. पहिली टप्प्यातील ५ हजार पोलिसांची भरती झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ७ हजार २३१ पोलिसांची भरती करण्यासंदर्भात नियमामध्ये बदल करणं गरजेचं होतं. त्या नियमांमधील दुरुस्तीनंतर पोलीस भरती करण्याचा निर्णय गृहविभागानं घेतला आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत