रोहित शर्माला टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून दिली जाऊ शकते विश्रांती . मुंबई प्रतिनिधी : भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने कर्णधार रो...
रोहित शर्माला टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून दिली जाऊ शकते विश्रांती .
मुंबई प्रतिनिधी : भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने कर्णधार रोहित शर्माबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. रोहितला टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून विश्रांती दिली जाऊ शकते, जेणेकरून तो त्याच्या कामाचा भार अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकेल, असे मत सेहवागने व्यक्त केले आहे. कर्णधार झाल्यापासून रोहितला दुखापतींमुळे आणि कामाचा ताण यामुळे अनेक सामने खेळता आलेले नाहीत.
सेहवाग म्हणाला, "टी-२० मध्ये नवीन कर्णधारासह रोहित शर्मा ब्रेक घेऊन कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी फ्रेश होण्यास सक्षम होईल." तसेच, वीरेंद्र सेहवागने म्हटले की भारतीय संघ व्यवस्थापनाला तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार हवा असेल तर रोहित शर्मा हा सर्वोत्तम पर्याय आहे. माजी कर्णधार विराट कोहलीने गेल्या वर्षी पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहित शर्माने भारताच्या टी-२० कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. कोहलीने युएईमधील टी-२० विश्वचषकापूर्वी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण टी-२० कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली होती. बीसीसीआय वरिष्ठ निवड समितीने रोहितला टी-२० कर्णधार म्हणून नियुक्त करण्याबाबत कोणताही दुसरा विचार केला नसताना, त्यांनी कोहलीला एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकले आणि व्हाईट बॉलच्या संघांची लगामही मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराकडे सोपवले.
..






कोणत्याही टिप्पण्या नाहीत