दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सिनेसृष्टीत मोठं नाव असणाऱ्या एका अभिनेत्याने देखील उद्धव ठाकरेंचे केले कौतुक. मुंबई प्रतिनिधी : महाविकास आघाडी ...
दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सिनेसृष्टीत मोठं नाव असणाऱ्या एका अभिनेत्याने देखील उद्धव ठाकरेंचे केले कौतुक.
मुंबई प्रतिनिधी : महाविकास आघाडी सरकारवर अडीच वर्षातच मोठं संकट आलं आहे. मविआ सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत गमावलं. परिणामी त्यांनी बहुमताच्या चाचणीला सामोरे जाण्याआधीच राजीनामा दिला. राज्यातील मविआ सरकार कोसळल्यानंतर देशभरातून याविषयी प्रतिक्रिया येत आहेत. सिनेसृष्टीतील विविध कलाकार देखील उद्धव ठाकरेंविषयी आणि भाजपविषयी त्यांची मतं मांडत आहेत. दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सिनेसृष्टीत मोठं नाव असणाऱ्या एका अभिनेत्याने देखील उद्धव ठाकरेंचे कौतुक केले आहे.
अभिनेते प्रकाश राज यांची भाजपविरोधी भूमिका अनेकदा त्यांच्या ट्वीटमधून दिसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लिहिताना ते अनेकदा दिसतात. दरम्यान अभिनेते प्रकाश राज यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांना 'चाणक्य' संबोधत कुणाचंही नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. तर त्यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
प्रकाश राज यांनी राज्यातील परिस्थितीविषयी केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, 'उद्धव ठाकरे सर तुम्ही चांगलं काम केलं आहे. मला विश्वास आहे की, ज्यापद्धतीने तुम्ही राज्यातील परिस्थिती हाताळली त्यामुळे महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी उभी राहील. आता कदाचित चाणक्य लाडू खात असले तरी तुमचा प्रामाणिकपणा दीर्घकालीन आहे. तुम्हाला अधिक शक्ति मिळो'.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत