काँग्रेस राष्ट्रवादीत काम केलेले नेतेच शिंदेंच्या गटात,मविआ नको म्हणून सेना आमदारांची बंडखोरी मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रातील महाविकास आघ...
काँग्रेस राष्ट्रवादीत काम केलेले नेतेच शिंदेंच्या गटात,मविआ नको म्हणून सेना आमदारांची बंडखोरी
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांच्या बंडामुळं अडचणीत सापडलंय. शिंदे समर्थक आमदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्यासाठी उद्धव ठाकरेंवर दबाव वाढवला. उद्धव ठाकरेंनी शिंदे समर्थकांची मागणी मान्य न केल्यानं राज्यातील सत्ता संघर्ष बहुमत चाचणीपर्यंत पोहोचला आहे. एकनाथ शिंदे समर्थक गुवाहाटीतून गोव्याकडे रवाना झाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार नको, अशी शिंदे समर्थकांची प्रमुख मागणी आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या ३९ आमदारांचं समर्थन आहे, त्यापैकी अनेक आमदारांनी यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची आघाडी सोडण्यसाठी पहिल्यांदा हिंदुत्वाचं कारण देण्यात आलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व मान्य करत नसल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची पार्श्वभूमी असलेल्या १५ आमदारांचा समावेश आहे.
ते आमदार कोण?
एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलेल्या नेत्यांचा समावेश आहे. शहाजी पाटील, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, सदा सरवणकर, यांनी यापूर्वी काँग्रेसमध्ये काम केलं आहे. महेंद्र दळवी, अनिल बाबर, महेश शिंदे, प्रकाश सुर्वे, दीपक केसरकर, उदय सामंत, प्रताप सरनाईक या आमदारांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं आहे.


.jpg)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत