2022 Mahindra Scorpio-N लाँच; ३० जुलै २०२२ पासून बुकिंगला सुरुवात..... नवी दिल्लीःप्रतिनिधी : कंपनीने भारतीय बाजारात या कारची किंमत ११.९९ ...
2022 Mahindra Scorpio-N लाँच; ३० जुलै २०२२ पासून बुकिंगला सुरुवात.....
नवी दिल्लीःप्रतिनिधी : कंपनीने भारतीय बाजारात या कारची किंमत ११.९९ लाख रुपये ते २३.९० लाख रुपये पर्यंत ठेवली आहे. या एसयूव्हीसाठी बुकिंग ३० जुलै पासून सुरू होणार आहे. आता कंपनीने याच्या डिलिव्हरीच्या तारखेचा खुलासा सुद्धा केला आहे. नवीन 2022 Mahindra Scorpio-N ची डिलिव्हरी २६ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.
बुकिंग डिटेल्स
महिंद्राच्या माहितीनुसार, Scorpio-N ची २० हजारांहून जास्त यूनिट्सला डिसेंबर २०२२ पर्यंत रोलआउट करण्याची योजना आहे. या एसयूव्हीची प्री बुकिंग ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबत महिंद्रा डिलरशीप वर ऑनलाइनवर सुरू होणार आहे.
इंट्रोडक्टरी किंमती
नवीन २०२२ महिंद्रा स्कॉर्पियो एन ला पाच ट्रिम लेवल Z2, Z4, Z6, Z8 आणि Z8 L मध्ये आणले आहे. जे अनेक व्हेरियंट्स मध्ये येतात. महिंद्राने ही सुद्धा घोषणा केली आहे की, 2022 Mahindra Scorpio-N ची सुरुवातीची किंमत फक्त पहिल्या २५ हजार बुकिंगसाठी मान्य राहिल. यानंतर याच्या किंमतीत वाढ होईल.
इंजिन आणि पॉवर
नवीन महिंद्रा स्कॉर्पियो एन मध्ये एमस्टॅलिन पेट्रोल इंजिन आहे. जे २०० पीएसचे पॉवर आमि ३८० एनएमचे टॉर्क जनरेट करते. दुसरा ऑप्शन एमहॉक डिझेल इंजिन आहे. जे १७५ पीएसचे पॉवर आणि ४०० एनएमचे टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये ६ स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्स आणि महिंद्राचे 4 XPLOR 4WD सिस्टम सोबत ६ स्पीड टॉर्क कन्वर्टर एटीचा समावेश आहे.









कोणत्याही टिप्पण्या नाहीत