Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

मध्य प्रदेशातील इंदौर येथे एसटी बस नर्मदा नदीत कोसळून मोठी दुर्घटना घडली; चालक व वाहकासह एकूण १३ जणांनी आपला जीव गमावला.

 मध्य प्रदेशातील इंदौर येथे एसटी बस नर्मदा नदीत कोसळून मोठी दुर्घटना घडली; चालक व वाहकासह एकूण १३ जणांनी आपला जीव गमावला. जळगाव प्रतिनिधी   ...

 मध्य प्रदेशातील इंदौर येथे एसटी बस नर्मदा नदीत कोसळून मोठी दुर्घटना घडली; चालक व वाहकासह एकूण १३ जणांनी आपला जीव गमावला.

मध्य प्रदेशातील इंदौर येथे एसटी बस नर्मदा नदीत कोसळून मोठी दुर्घटना घडली; चालक व वाहकासह एकूण १३ जणांनी आपला जीव गमावला

जळगाव प्रतिनिधी  : मध्य प्रदेशातील इंदौर येथे एसटी बस नर्मदा नदीत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर डेपोची बस मध्य प्रदेशातील खलघाट आणि ठिगरी येथील नर्मदा नदीच्या पुलावरून नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत एसटीच्या चालक आणि वाहकासह एकूण १३ जणांनी आपला जीव गमावला आहे. तसंच मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

pitambari


इंदोर-अमळनेर ही बस (एम.एच.४० ओ एन.९८४८) आज सोमवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास इंदौर येथून अमळनेरकडे येण्यासाठी निघाली. चालक चंद्रकांत पाटील आणि वाहक प्रकाश श्रावण चौधरी हे बस घेऊन येत होते. मात्र खलघाट आणि ठिगरी येथील पुलावर आल्यानंतर बसचा टायर फुटला आणि बस थेट नर्मदा नदीच्या पात्रात कोसळली.
pitambari


घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी धाव घेतली. तसंच इंदौर व धार येथून एनडीआरएफ व एसडीआरएफच्या जवानांना घटनास्थळी तात्काळ पाठवण्यात आले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी प्रशासनाला बचावकार्याचे आदेश दिले. त्यानंतर नदीपात्रातून आतापर्यंत १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून यातील आठ जणांची ओळख पटली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place