रामदास कदम यांचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र', उद्धव यांना खरमरीत पत्र......... मुंबई प्रतिनिधी : बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, पहि...
रामदास कदम यांचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र', उद्धव यांना खरमरीत पत्र.........
मुंबई प्रतिनिधी : बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, पहिल्या फळीतील शिवसेना नेते रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही, हे मला पहायला मिळालं, अशी खंत व्यक्त करत त्यांनी जय महाराष्ट्र केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी, शिवसेना पक्ष स्थापन झाल्यापासून ज्यांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून कोकणात शिवसेना पक्ष वाढवला, नारायण राणेंनी सेनेला जय महाराष्ट्र केल्यावर त्यांच्याविरोधात कोकण पिंजून काढलं, महाराष्ट्रातलही शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीवर प्रसंगी भाजपवरही तुटून पडले, त्याच रामदास कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम कधीच केलं नाही. उलटपक्षी माझा आणि माझा मुलगा आमदार योगेश कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आलं, अशी खंत त्यांनी राजीनामा पत्रात व्यक्त केली आहे.

.jpg)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत