सत्तांतरानंतर महाराष्ट्रात पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त ; पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे... मुंबई प्रतिनिधी : राज्यात सत्ता...
सत्तांतरानंतर महाराष्ट्रात पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त ; पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...
मुंबई प्रतिनिधी : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता शिंदे आणि भाजप सरकारने एकत्र येत अनेक राज्याच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या कामांना सुरुवात केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे इंधनावरील करात कपात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपये तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे.आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी इंधनावरील करकपातीची घोषणा केली. यावेळी त्यांनी कोणत्या घोषणा केल्या. जाणून घ्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...
शिंदे-भाजप यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...
- शासनाने काही लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. शासन सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारं आहे
- समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा काम करु, आम्ही त्याची सुरुवात पहिल्याच कॅबिनेटमध्ये केली होती.
- आज मला आनंद याठिकाणी समाधानी वाटत आहे. कारण, आम्ही चर्चा करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहेत.
- पेट्रोलवर ५ आणि डिझेलवर ३ रुपयांची कपात
- सरकारच्या तिजोरीवर ६००० कोटी रुपयांचा भार पडेल. पण याने जनतेला दिलासा मिळेल
- करोना रोखण्यासाठी सगळ्यांना बुस्टर डोस फ्री
- केंद्र स्वच्छ भारत टप्पा २ यासाठी राज्य सरकार काम करणार, कचऱ्याचं व्यवस्थापन, अमृत अभियान, पाणी पुरवठा योजना, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट यावर काम होईल.
- नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार- ५० हजार रुपयांचे
- १८ ते ५० वयोगटातील लोकांना करोनाचा बुस्टर डोस मोफत मिळणार
- सरपंच आणि नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड केली जाणार
- बाजर समितीमध्ये शेतकऱ्यांना थेट मतदान करण्याचा अधिकार
- आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्यांना पेन्शन लागू होणार
- पूरगस्त भागातील शेतकऱ्यांना योजनेतेून वगळले जाणार नाही
- राज्यात "स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान" राबविण्यात येणार (नगर विकास विभाग)
- केंद्र पुरस्कृत अमृत अभियान 2.0 राज्यात राबवणार (नगर विकास विभाग)
- अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढवणार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत