Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

शिंदे-फडणवीस सरकारकडून रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोग पदावरून खेचण्यासाठी प्रयत्न केले जातात का ?

  शिंदे-फडणवीस सरकारकडून रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोग पदावरून खेचण्यासाठी प्रयत्न केले जातात का ? मुंबई प्रतिनिधी  : राज्यात २० जून...

 शिंदे-फडणवीस सरकारकडून रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोग पदावरून खेचण्यासाठी प्रयत्न केले जातात का ?

शिंदे-फडणवीस सरकारकडून रुपाली चाकणकर यांनाराज्य महिला आयोग पदावरून खेचण्यासाठी प्रयत्न केले जातात का ?

मुंबई प्रतिनिधी  : राज्यात २० जून रोजी विधानपरिषद निवडणूक झाल्यानंतर मोठं राजकीय नाट्य घडलं आणि स्थिर वाटणारं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेनेतील बंडखोरीमुळे सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात झालेल्या या सत्तापालटाचा परिणाम राज्य महिला आयोगावरही होणार असल्याची चर्चा रंगत असून या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं पद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

sonai


'महिला आयोगाचं अध्यक्षपद हे घटनात्मक पद आहे. हे पद स्वीकारण्यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सोडलं होतं. त्यामुळे आता नवीन सरकार आलं असलं तरी हे पद सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,' असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सध्या तरी चाकणकर या राजीनामा देण्याच्या तयारीत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून रुपाली चाकणर यांचे नियमित दौरे अजूनही सुरू आहेत. नुकतीच त्यांनी नाशिक येथील पोलीस आयुक्त कार्यालयाला भेट दिली आणि पोलीस आयुक्तांसोबत कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, बाल विवाह या व महिलांसंबंधी असलेल्या इतर विविध प्रकरणांबाबतीत आढावा बैठक घेतली.

pitambari


रुपाली चाकणकर यांनी आपण महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडणार नसल्याचं स्पष्ट केल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारकडून चाकणकर यांना पदावरून खाली खेचण्यासाठी काही प्रयत्न केले जातात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.दरम्यान, राज्यात २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार जाऊन महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा विजया रहाटकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्याबाबत आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहावं लागेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place