Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

देवेंद्र फडणवीस यांनी माईक न ओढण्याची खबरदारी घेतली;दोन माईक आणि कोणतीही चिठ्ठी नाही देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट.

 देवेंद्र फडणवीस यांनी माईक न ओढण्याची खबरदारी घेतली;दोन माईक आणि कोणतीही चिठ्ठी नाही देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट. मुंबई प्रतिनिधी  : म...

 देवेंद्र फडणवीस यांनी माईक न ओढण्याची खबरदारी घेतली;दोन माईक आणि कोणतीही चिठ्ठी नाही देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट.

देवेंद्र फडणवीस यांनी माईक न ओढण्याची खबरदारी घेतली;दोन माईक आणि कोणतीही चिठ्ठी नाही देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट.

मुंबई प्रतिनिधी  : मुख्यमंत्र्यांसोबतच्या पत्रकार परिषदेत माईक ओढून घेणे आणि चिठ्ठी देणे या प्रकारावरून टीका झाल्यानंतर पुन्हा असं होऊ नये याची खबरदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात येत असल्याचं आजच्या पत्रकार परिषदेत दिसलं आहे. दोन माईक ठेवलेले आहेत आणि कोणतीही चिठ्ठी नाही, असं पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.

pitambari


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना शिंदेंसमोरचा माईक ओढून घेतला होता. त्यावरून बरीच टीका झाली होती. हा मुख्यमंत्र्यांचा अपमान असल्याचा आक्षेप विरोधी पक्षांकडून घेण्यात आला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा असा अपमान कधी झाला नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. तर हे सरकार टिकणार नाही यांची आतापासूनच माईकची ओढाओढी सुरू झाली, असं राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं होतं.

pitambari


माईक ओढण्याच्या प्रकारानंतर दुसऱ्या एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना देवेंद्र फडणवीसांनी चिठ्ठीवर मजकूर लिहून शिंदेंसमोर चिठ्ठी सरकवली होती. यावरूनही टीका होत आहे. या टीकेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस सावध झाले असून शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दोन माईक ठेवण्यात आले होते. तसंच कोणतीही चिठ्ठी नाही असे फडणवीसांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place