Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

आजचा राशी बदलामुळे तुमचा दिवस कसा जाईल ते पहा ......

 आजचा राशी बदलामुळे तुमचा दिवस कसा जाईल ते पहा मेष   मेष : आरोग्य उत्तम राहील धनू राशीतून होणारी गुरुपौर्णिमा तुमच्या भाग्य स्थानातून होत आह...

 आजचा राशी बदलामुळे तुमचा दिवस कसा जाईल ते पहा



mesh ras

मेष  

मेष : आरोग्य उत्तम राहील

  • धनू राशीतून होणारी गुरुपौर्णिमा तुमच्या भाग्य स्थानातून होत आहे. या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून नवीन संकल्पनांना सुरुवात करा. पौर्णिमेचा प्रहर शुभदायक ठरेल. दिनांक १०, ११ रोजी मात्र सहनशीलता ठेवून काम करावे लागेल. कारण या दिवशी जबरदस्तीने एखादी गोष्ट करायला गेला तर ती अंगलट येऊ शकते. त्यासाठी झेपेल अशाच गोष्टी करा. बाकी कालावधी चांगला असेल. व्यावसायिकदृष्टय़ा परिस्थितीत बदल घडेल. हा बदल मात्र निश्चितच फायदा मिळवून देणारा आहे. उत्पादनात झपाटय़ाने वाढ होईल. नोकरदार वर्गाने वरिष्ठांना विश्वासात घेऊन नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. आर्थिकदृष्टय़ा अनपेक्षित लाभ होईल. समाजसेवेमध्ये गुंतून राहाल. मित्रांसोबत करमणूक घडेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा. आरोग्य उत्तम राहील.

                     शुभ दिनांक : १२, १६

                     महिलांसाठी : स्वत:साठी वेळ द्याल.

वृषभ 


                                    वृषभ : मेहनतीचे फळ मिळेल


ही गुरुपौर्णिमा अष्टम स्थानातून होत आहे. तेव्हा या पौर्णिमा प्रहरात घाईगडबडीने कृती करणे टाळा. दिनांक १२, १३ रोजीचे हे दोन्ही दिवस स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला शिका. इतरांवर अवलंबून कोणताही निर्णय घेऊ नका. त्यामुळे तुम्ही ठरवलेल्या नियोजनाची घडी विस्कळीत होऊ शकते. व्यवसायाच्या निमित्ताने अनेक लोकांशी संपर्क वाढेल. व्यावसायिकदृष्टय़ा पळापळीचा मार्ग जरी असला तरी त्यातून अनपेक्षित असे लाभ मिळतील. भागीदारी व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल. नोकरदार वर्गाला मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक परिस्थितीत चांगला बदल घडेल. राजकीय क्षेत्रात मनमोकळेपणाने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराल. घरातील वातावरण आनंदी असेल. धार्मिक गोष्टीत मन रमेल. शारीरिकदृष्टय़ा मात्र आराम घेणे गरजेचे वाटेल.
 शुभ दिनांक : १४, १५
महिलांसाठी : अडचणींवर मात करणे चांगले जमेल.

 

 मिथुन 

मिथुन : संयम ठेवा


गुरुपौर्णिमा सप्तम स्थानातून होत आहे. या गुरुपौर्णिमेच्या प्रहरात जोडीदारांसोबत धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. गुरूसमान असलेल्या व्यक्तींचा आदरपूर्वक सन्मान कराल. सध्या चंद्र ग्रहाचे भ्रमण षष्ठ स्थानातून अष्टम स्थानाकडे होत आहे. एखाद्या व्यक्तीला सल्ला देताना विचार करा. व्यक्ती जवळची असो व लांबची. चांगल्या भावनेने दिलेल्या सल्ल्याचासुद्धा गैरसमज होऊ शकतो. सध्या आपण आणि आपले काम भले असेच वागलेले चांगले. व्यवसायात व्यापारी वर्गाने वनस्पतीजन्य मालाची खरेदी मोठय़ा प्रमाणात करणे टाळा. कोणताही व्यवहार रोखीने करा. नोकरदार वर्गाला कामामधील उत्साह कमी वाटेल. आर्थिक बाबतीत खर्च जपून करा. राजकीय क्षेत्रात बोलताना संयम ठेवा. कुटुंबातील सदस्यांची आवड-निवड जपा. मानसिक- शारीरिकदृष्टय़ा काळजी घ्या.

शुभ दिनांक : १२, १३

महिलांसाठी : टोकाचे निर्णय टाळा

 

karka ras कर्क 

                               कर्क : तडजोड स्वीकारा


गुरुपौर्णिमा षष्ठ स्थानातून होत आहे. या पौर्णिमा प्रहरात मर्यादा ओलांडू नका. ही पौर्णिमा सुखकर करण्याचा प्रयत्न करा. षष्ठ स्थानातून अष्टम स्थानाकडे होणारे चंद्राचे प्रमाण अनुकूल कसे होईल याकडे लक्ष द्या. चांगल्या गोष्टींना सुरुवात करण्यासाठी थोडे थांबा. सध्या इच्छा असली तरी त्याला गती मिळणार नाही. समोरून येणारे प्रस्ताव स्वीकारायचे की नाही हे आपल्या हातात आहे. तेव्हा हे प्रस्ताव लांबणीवर टाका. व्यवसायातील धाडसी प्रयोग टाळा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांनी ठरवून दिलेल्या कामाच्या बाबतीत तडजोड स्वीकारावी लागेल. आर्थिक व्यवहार मात्र जपून करा.  राजकीय क्षेत्रातील मागील अनुभव विसरू नका. मुलांसोबत वेळ घालवाल. घरातील. वातावरण बोलण्याने गढूळ करू नका. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा.

शुभ दिनांक : १०, ११

महिलांसाठी : अतिविचार करणे टाळा.

 

siha ras

 सिंह 

सिंह : नियोजनानुसार काम करा


गुरुपौर्णिमा पंचम स्थानातून होत आहे. गुरुपौर्णिमा आनंद देणारी असेल. या दिवशी चांगल्या गोष्टींची सुरुवात होईल. दिनांक १४, १५ रोजी जाणूनबुजून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. स्पष्ट बोलण्याने इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. या दोन दिवसांत शांत राहून कसे काम करता येईल याकडे लक्ष द्या. व्यावसायिकदृष्टय़ा नियोजनानुसार काम केल्यास भरभराट होईल. आवक-जावक उत्तम राहील. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत होणाऱ्या त्रासाचे प्रमाण कमी होईल. आर्थिकदृष्टय़ा खर्चावर नियंत्रण ठेवा. राजकीय क्षेत्रात बिघडलेली स्थिती आटोक्यात येईल. मित्र-परिवारासोबत गप्पा-गोष्टीत रमून जाल. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींच्या तब्येतीत सुधारणा घडेल. जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

शुभ दिनांक : १२, १३

महिलांसाठी : ज्या गोष्टीतून नुकसान होणार आहे अशा गोष्टींचा अट्टहास टाळा.

 

kanya ras

कन्या 

कन्या : सकारात्मक गोष्टी घडतील


गुरुपौर्णिमा चतुर्थ स्थानातून होत आहे. या गुरुपौर्णिमेनिमित्त योजलेल्या मनोकामना पूर्ण होतील. दिनांक १६ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. सुरुवात कोठून आणि कशी करायची ही द्विधा अवस्था सध्या बाजूला ठेवा. योग्य तो ठाम निर्णय घ्यायला शिका.  व्यापारी क्षेत्रात देवाणघेवाण सुरळीत चालू ठेवण्यासाठी प्रथम तांत्रिक अडचणी दूर करायला हव्या. मोठय़ा गुंतवणुकीतून फायदा जरी असला तरी त्यासाठी तेवढे कष्टपण मोठे असतील. नोकरदार वर्गाची कामामध्ये होणारी तारांबळ कमी होईल. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे लक्ष द्या. सार्वजनिक ठिकाणी कामातील उत्साह वाढेल. सकारात्मक गोष्टी घडतील. मुलांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. घरगुती वातावरण चांगले राहील. आरोग्य ठणठणीत असेल.

शुभ दिनांक : १४, १५

महिलांसाठी : व्यवस्थापन करणे उत्तम जमेल.

 

tula ras

तूळ 

तूळ : प्रगतीचा सप्ताह


गुरुपौर्णिमा पराक्रमस्थानातून होत आहे. ही पौर्णिमा उत्साहाने साजरी कराल. आठवडय़ातील सर्व दिवस चांगले जातील. आजचे काम उद्यावर जात होते ते जाणार नाही. बाकी राहिलेले व्यवहार पूर्ण होतील. तेव्हा या संधीचा फायदा घेऊन सुरुवात करा. व्यावसायिक वाटचाल यशस्वी असेल. व्यवसायात स्थिरता प्राप्त होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून मिळालेल्या नियमावलीनुसार कामकाज सुरू करावे लागेल. आर्थिकदृष्टय़ा सक्षमता वाढेल. सार्वजनिक ठिकाणी युक्तिवाद कमी पडेल. नातेवाईकांशी कार्यक्रमानिमित्त झालेल्या भेटीगाठीतून मनमोकळेपणाने संवाद साधाल. शेजारधर्माविषयी आपुलकी वाटेल. मुलांच्या बाबतीत घेतलेले निर्णय योग्य असतील. उपासनेत मन रमेल. एकूणच सप्ताह प्रगतीचा राहील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्याबाबतीत असलेल्या तक्रारी दूर होतील.

 शुभ दिनांक : १० , १६

महिलांसाठी : परोपकारी वृत्ती राहील.

 

ruchik ras

वृश्चिक 

वृश्चिक : व्यवहार पूर्ण होतील


गुरुपौर्णिमा धनस्थानातून होत आहे. या पौर्णिमा काळात सुखाचे क्षण अनुभवाल. खूप प्रयत्न करूनही एखाद्या गोष्टीला यश मिळत नव्हते, हीच परिस्थिती बदलणारी आहे. प्रयत्नाचे फळ मिळणारच आहे. पण त्यासाठी फारसे कष्ट करावे लागणार नाही. समोरून येणारी संधी ही तुमच्या प्रत्येक गोष्टींमध्ये चांगला बदल करणारी असेल. तेव्हा ही संधी सोडू नका. पूर्वपरंपरेनुसार चालत आलेल्या व्यवसायात केलेले बदल नफा मिळवून देईल. नोकरदार वर्गाला ज्येष्ठांचा पािठबा राहील. आर्थिकदृष्टय़ा रोखीचे व्यवहार पूर्ण होतील. सामाजिक माध्यमाद्वारे नावलौकिक वाढेल. भावंडांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक जीवन सुखाचे राहील. मानसिक ताण कमी होईल. आरोग्याची काळजी मिटेल.

शुभ दिनांक : १० , ११

महिलांसाठी : चंचलता वाढेल.

 

धनू 

                                     धनू : वैवाहिक सौख्य उत्तम


गुरुपौर्णिमा तुमच्या राशीतूनच होत आहे. ही गुरुपौर्णिमा संस्मरणीय ठरेल. दिनांक १०, ११  रोजी कोणत्याही कामात अति घाई करू नका. ती कामे पुढे ढकला. इतरांनी कान भरवण्याचा प्रयत्न केला तरी ऐकीव बातमीवर विश्वास ठेवू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. व्यवसायात तोंडी व्यवहार करणे टाळा. उशीर झाला तरी चालेल. पण रोखठोक व्यवहाराला महत्त्व द्या. कामाचा वेग वाढवावा लागेल. नोकरदार वर्गाला कसरतीचे दिवस कमी होतील. आर्थिक बाबतीत खर्च जपून करा. सार्वजनिक ठिकाणी पुढारीपणा करायला आवडेल. पण हाच पुढारीपणा अंगलट येणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घ्याल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.

शुभ दिनांक : १३, १४

महिलांसाठी : प्रश्न मार्गी लागतील.



 

मकर

                       मकर : भागीदारी टाळा


गुरुपौर्णिमा व्ययस्थानातून होत आहे. या पौर्णिमा प्रहरात शांततेच्या मार्गाने वाटचाल ठेवा व पौर्णिमा सुखकर करण्याचा प्रयत्न करा. दिनांक १२,१३  रोजी कोणत्याही गोष्टीचा सोक्षमोक्ष करताना भान ठेवा. त्यासाठी पर्यायी मार्ग शोधा. तडकाफडकी निर्णय टाळा. व्यवसायात सर्व गोष्टी चांगल्या असतील. भागीदारी व्यवसायाचा प्रस्ताव येईल. मात्र तो न स्वीकारण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. स्वतंत्र व्यवसायालाच महत्त्व द्या. नोकरदार वर्गाची काम करण्याची उत्सुकता कमी झाली तरी कामे वेळेवरच करावी लागतील. आर्थिकदृष्टय़ा खर्च कमी करा. राजकीय क्षेत्रात सध्या मन लागणार नाही. कुटुंबाचा पाठिंबा राहील. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. शारीरिकदृष्टय़ा योग साधनेला महत्त्व द्या.

शुभ दिनांक : १० , १६

महिलांसाठी : जबाबदारीत अडकून राहू नका.


kumbha ras

 

कुंभ

कुंभ : शुभ घटनांचा काळ


गुरुपौर्णिमा लाभस्थानातून होत आहे. या गुरुपौर्णिमेनिमित्त ठरवलेले ध्येय साध्य होईल. दिनांक १४, १५ रोजी उतावळेपणाने घेतलेले निर्णय त्रासाचे ठरू शकतात. या दोन दिवसांत मात्र जपून वाटचाल करा. अनोळख्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. बाकी दिवस उत्तम जातील. नवनवीन कल्पना अमलात आणण्याचे ध्येय प्रत्यक्षात उतरू लागेल. मागील काही दिवस अस्थिर वाटू लागत होते ती अस्थिरता कमी होईल. व्यवसायात खरेदी-विक्री व्यवहारातून मोठय़ा प्रमाणात नफा होईल. शुभ घडामोडी होतील. स्वतंत्र व्यावसायिकांना सध्याचे दिवस लाभदायक ठरतील. नोकरदार वर्गाला कामात वेळ जाईल. आर्थिक देणे वेळेत फेडाल. मित्र परिवारासोबत महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा कराल. मुलांची साथ राहील. आरोग्याच्या बाबतीत जुन्या व्याधींकडे दुर्लक्ष करू नका.

शुभ दिनांक : १२,१३ 

महिलांसाठी : चिडचिड कमी होईल.



 

मीन

                        मीन : मनोकामना पूर्ण होईल


गुरुपौर्णिमा दशमस्थानातून होत आहे. ही गुरुपौर्णिमा थोरामोठय़ांची कृपा मिळवून देईल. भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. या सप्ताहात मनोकामना पूर्ण होतील. ज्या गोष्टींविषयी खात्री वाटत नव्हती ती वाटू लागेल. कोणत्याही गोष्टी प्रसिद्धी मिळवणे हा हेतू नसला तरी ते मिळण्याचे संकेत नाकारता येणार नाहीत. व्यावसायिकदृष्टय़ा व्यवहारात पारदर्शकता येऊ लागेल. अनेक माध्यमातून लाभ होईल. नोकरदार वर्गाला रचनात्मक बदल करणे सहज जमेल. आर्थिक दृष्टय़ा खर्च कमी होतील. राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल. नातेवाईकांसोबत एखाद्या कार्यक्रमानिमित्त आनंदाचे क्षण अनुभवाल. घरगुती वातावरण चांगले असेल. मानसिक शांतता लाभेल. उपासनेत मन रमेल. आरोग्य उत्तम राहील.

शुभ दिनांक : १० , १४

महिलांसाठी : नवीन गोष्टीचा शुभारंभ होईल.





 



 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place