Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

नव्या सरकारकडून आमदार महेश शिंदे याच्या सातारा कोरेगाव शहराच्या विकासकामांसाठी २० कोटी रुपयांचा निधी.

 नव्या सरकारकडून आमदार महेश शिंदे याच्या सातारा कोरेगाव शहराच्या विकासकामांसाठी २० कोटी रुपयांचा निधी. सातारा प्रतिनिधी : आमदार महेश शिंदे ...

 नव्या सरकारकडून आमदार महेश शिंदे याच्या सातारा कोरेगाव शहराच्या विकासकामांसाठी २० कोटी रुपयांचा निधी.

नव्या सरकारकडून आमदार महेश शिंदे याच्या सातारा कोरेगाव शहराच्या विकासकामांसाठी २० कोटी रुपयांचा निधी

सातारा प्रतिनिधी : आमदार महेश शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सोबत गेल्यानंतर काही दिवसात कोरेगावला निधी स्वरुपात मोठं‌ गिप्ट दिलं गेलंय. नव्या सरकारकडून कोरेगाव शहराच्या विकासकामांसाठी २० कोटी रुपयांचा निधी दिला गेला. या माध्यातून मतदारसंघाच्या विकासासाठी हे सरकार किती उपयोगी आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न महेश शिंदेंनी केल्याचं पहायला मिळतंय. महेश शिंदे यांनी करोना काळात केलेलं मोठं काम आणि कोरेगाव मतदारसंघात खेडोपाडी जावून त्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यामुळे त्यांना मंत्रीपद मिळावं, अशी मागणी मतदारसंघातून जोर धरू लागली आहे.

pitambari


आमदार असताना एवढा मोठा निधी महेश शिंदे आणू शकतात. तर मंत्री झाल्यानंतर कोरेगाव आणि मतदारसंघाचा किती कायापालट होईल, अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे. करोना काळात जेव्हा आमच्याकडं कोणताच नेता पहात नव्हता तेव्हा आमदार महेश शिंदेंनी स्वत: उभारलेल्या दवाखान्यात आमच्या घरच्यांना आणि आम्हाला ठणठणीत बरं केलंय, अशा भावना लोकं बोलुन दाखवतायेत. यामुळे लोकांची सेवा करणाऱ्या आमदारांना मंत्रीपद मिळावं, अशा मतदारसंघातल्या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. तसंच महेश शिंदे यांचे कार्यकर्ते सुद्धा मंत्रीपदाची अपेक्षा असल्याचं आता बोलून दाखवतायेत.

pitambari


राष्ट्रवादीच्या कोणत्याही बड्या नेत्याला शिंगावर घेण्याची ताकद महेश शिंदे स्वत:कडे बाळगतात. यामुळे राष्ट्रवादीला सातारा जिल्ह्यात आणि कोरेगाव मतदारसंघात बॅकफुटला न्यायचं असेल तर महेश शिंदेंना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मंत्रीपदाच्या रुपानं ताकद देवू शकतात, असं बोललं जातंय. तसंच आमदार महेश शिंदे हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. यामुळे महेश शिंदे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते, अशा शक्यता सुद्धा वर्तवल्या जात आहेत. येत्या रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. सुमारे २५ मंत्री यामध्ये शपथ घेतील अशी शक्यता सूत्रांनी वर्तवलीये. यामुळे या मंत्रिमंडळात महेश शिंदे यांची वर्णी लागतेय का? याची सातारा जिल्ह्यातील नागरिकांना उत्सुकता लागली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place