Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

राष्ट्रवादी काँग्रेसची साथ देणाऱ्या सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश.

 राष्ट्रवादी काँग्रेसची साथ देणाऱ्या सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश. मुंबई प्रतिनिधी : फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या तथा परिवर्तनवादी ...

 राष्ट्रवादी काँग्रेसची साथ देणाऱ्या सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश.

राष्ट्रवादी काँग्रेसची साथ देणाऱ्या सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी : फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या तथा परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. "लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण मी त्यापैकी नाहीये. ठाकरेंवर संकटाची वेळ आलेली असताना भावाच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आज शिवसेनेत प्रवेश करतीये. मला पक्षाकडून कोणतीही अपेक्षा नाहीये. फक्त देशाचं संविधान वाचविण्यासाठी मला भाजपविरोधात लढायचं आहे", अशा भावना सुषमा अंधारे यांनी शिवसेना पक्षप्रवेशावेळी व्यक्त केल्या. तर उद्धव ठाकरेंनी देखील सुषमा अंधारे यांना शिवसेना प्रवेशाचं गिफ्ट दिलं. पक्षात प्रवेश केल्याबरोबर त्यांनी अंधारे यांची नियुक्ती शिवसेनेच्या उपनेतेपदी केली. यावेळी आगामी काळात ग्रामीण भागांतून कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली पाहिजे, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांच्याकडून व्यक्त केली.

pitambari


आंबेडकरी विचारांची धडाडती तोफ, गेल्या पंधरा वर्षांपासून फुले-आंबेडकरी विचार वाडी-वस्ती-तांड्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या वक्त्या तसेच मागील काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसची साथ देणाऱ्या सुषमा अंधारे यांच्या हाती शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवबंधन बांधलं. हा पक्षप्रवेशाचा सोहळा मातोश्रीच्या प्रांगणात पार पडला. या सोहळ्याला स्वत: उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, उपनेत्या नीलम गोऱ्हे, आमदार सचिन अहिर, तथा शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. सुषमा अंधारे यांच्यासह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी देखील सेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. सुषमा अंधारे यांच्या रुपाने शिवसेनेला सभा गाजवणाऱ्या आक्रमक नेत्या तसेच ठामपणे बाजू मांडणाऱ्या निडर नेत्या मिळाल्या आहेत. ठाकरे कुटुंब संकटात असताना एक बहीण म्हणून आपण त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे.

pitambari


पक्षप्रवेशानंतर सुषमा अंधारे म्हणाल्या, "कालपासून मला माध्यमांचे प्रतिनिधी विचारतायेत, शिवसेनेत कुठलं लाभाचं पद असेल. त्यांना मी सांगितलं, माझ्या डोक्यावर ना ईडी फाईल्सचं ओझं आहे ना कुठला गैरव्यवहार केलाय. मला शिवसेनेत जागा हवी असेल तर शिवसैनिकांच्या हृदयात, प्रत्येक शिवसैनिकाची बहिण म्हणून मला त्यांचं प्रेम पाहिजे. मला अजूनही शिवसेनेतील पीठा-मीठाचे, चहा-साखरेचे डबे माहिती नाहीत, येथील पद्धती माहिती नाहीत. त्यामुळे मला सांभाळून घ्या. निलमताई गोऱ्हे या मला आईप्रमाणे सांभाळून घेणाऱ्या आहेत. तर सचिन अहिर यांच्या रुपाने माहेरचा माणूस माझ्यासोबत आहे. मी आपल्या सगळ्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. आज जोरजोरात गळे काढून रडायचे आणि नंतर दुसऱ्या गटात सामील व्हायचे, असा प्रकार माझ्याकडून घडणार नाही", असा विश्वास सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place