उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याने रिक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी रामदास कदम यांचं नाव चर्चेत. मुंबई प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र...
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याने रिक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी रामदास कदम यांचं नाव चर्चेत.
मुंबई प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासोबतच विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरुन आता रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेवरील आमदारकीसाठी आता एकनाथ शिंदे गटात चढाओढ रंगण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून हकालपट्टी केलेले माजी मंत्री रामदास कदम यांचं नाव या जागेसाठी चर्चेत आहे.
विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांशिवाय आणखी एक जागा सध्या रिक्त आहे. ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या जागेवर शिंदे गट दावा सांगणार की, ती जागा भाजपच्या पारड्यात पडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडे जागा गेल्यास चढाओढ होण्याची शक्यता आहे.
विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांशिवाय आणखी एक जागा सध्या रिक्त आहे. ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या जागेवर शिंदे गट दावा सांगणार की, ती जागा भाजपच्या पारड्यात पडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडे जागा गेल्यास चढाओढ होण्याची शक्यता आहे.
रामदास कदम विधिमंडळाबाहेर
शिवसेनेत रामदास कदम यांनी पर्यावरण मंत्रालयाची धुरा सांभाळली होती. ते चार वेळा विधानसभेवर, तर दोन वेळा परिषदेवर आमदार आहेत. गेल्या वेळी तिकीट नाकारल्यानंतर ते काहीसे नाराज होते. अखेर एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर त्यांनीही शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला.\
उद्धव ठाकरेंशी खास कनेक्शन
रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक खास कनेक्शन आहे. दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी येतो. २७ जुलै. मात्र रामदास भाई उद्धव ठाकरेंपेक्षा सात वर्षांनी मोठे आहेत. १९५३ मध्ये जन्मलेल्या कदमांनी नुकतंच सत्तरीत पदार्पण केलं. तर १९६० मध्ये जन्म झालेल्या ठाकरेंनी वयाची ६२ वर्ष परवा पूर्ण केली. या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या होत्या. तर कदमांना शुभेच्छा देण्यासाठी शिंदेंनी थेट मुंबईतील कांदिवली भागात असलेलं त्यांचं पालखी निवासस्थान गाठलं होतं.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत