अभिनेत्री दिशा परदेशी बनली ‘कन्याकुमारी’ मुंबई प्रतिनिधी - गणेश तळेकर : लग्न म्हणजे कौटुंबिक उत्सवच... मित्रमंडळी, सगेसोयरे यांच्यासोबतच दो...
अभिनेत्री दिशा परदेशी बनली ‘कन्याकुमारी’
मुंबई प्रतिनिधी - गणेश तळेकर : लग्न म्हणजे कौटुंबिक उत्सवच... मित्रमंडळी, सगेसोयरे यांच्यासोबतच दोन जीवांना, दोन घरांना एकत्र आणणारा मिलनसोहळाच. प्रत्येकाची लग्नाविषयी स्वत:ची काही स्वप्नं असतात. परिकथेत रमणाऱ्या, भावी जोडीदाराची स्वप्न पहाणाऱ्या एका कन्याकुमारीची लगीनघाई आपल्याला ‘व्हिडिओ पॅलेस’ निर्मित ‘कन्याकुमारी’ या मराठमोळया अल्बममधून पहायला मिळणार आहे. नुकताच या गीताचा प्रकाशन सोहळा पारंपारिक पद्धतीने दिमाखात संपन्न झाला.
एका सुंदर गीताला मिळालेली उत्तम सूर, संगीताची साथ सोबत अप्रतिम छायांकन आणि नृत्यदिग्दर्शन यामुळे ही मराठमोळी ‘कन्याकुमारी’ नववधूच्या साजिऱ्या रुपात आपल्यासमोर अवतरली आहे. लगीनघरातील माहोल, पाहुण्यांची लगबग, बच्चेकंपनीची धमालमस्ती आणि नववधूच्या मनातील हूरहूर याचे सुरेख चित्रण या गीतामध्ये पहायला मिळणार आहे. दिशा परदेशी या सुंदर अभिनेत्रीवर हे गीत चित्रीत झाले असून तिला अक्षय वाघमारे या हँडसम अभिनेत्याची उत्तम साथ लाभली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत