कवितेच्या सावलीत "नवकोरं" ला रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला...... मुंबई प्रतिनिधी - गणेश तळेकर : नवंकोर' हा कार्यक्...
कवितेच्या सावलीत "नवकोरं" ला रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला......
मुंबई प्रतिनिधी - गणेश तळेकर : नवंकोर' हा कार्यक्रम वायर्ड एक्स्प्रेसन आणि ठीक्करबिल्ला निर्मित, संकल्प थिएटर आणि कल्चरल अकॅडमी मुंबई आयोजित हा कार्यक्रम नुकताच दिनांक :- १०/७/२०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजता दादर माटुंगा कल्चर सेंटरमध्ये सादर करण्यात आला.
मराठी प्रेक्षकांच्या कवितेविषयी असलेल्या भावना लक्षात घेऊन आजवर अनेक कार्यक्रम झाले आहेत. पण, नवंकोरं काहीतरी नवं रसिक प्रेक्षकांच्यासमोर सादर करण्यात आले. नव्या दमाचे तरुण कवींनी एकत्र येऊन, जुने आणि नवे प्रवाह एकत्र करत कवितांची नवी चळवळ उभारू पाहली. संकेत अरुण म्हात्रे, प्रथमेश किशोर पाठक, आदित्य प्रवीण दवणे आणि स्पृहा जोशी हे सादरकर्ते आपल्या कविता, गझल, गप्पांमधून प्रेक्षकांना काही नवं देण्याचा प्रयत्न केला. नवीन तसेच ज्येष्ठ कवींच्या कविता या दोन तासांत ऐकायला मिळाल्या रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत