व्हीपच्या बाबतीत विधान भवनात शिवसेनेतअजूनही संभ्रम कायम ? मुंबई प्रतिनिधी : बाळासाहेब थोरात यांनी मुद्दा मांडल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष न...
व्हीपच्या बाबतीत विधान भवनात शिवसेनेतअजूनही संभ्रम कायम ?
मुंबई प्रतिनिधी : बाळासाहेब थोरात यांनी मुद्दा मांडल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सुनील प्रभू यांचं पत्र रेकॉर्डवर घेतलं. शिवसेना आमदारांनी राजन साळवी यांना मतदान करावं, असा व्हीप प्रतोद सुनील प्रभू यांनी जारी केला होता. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी शिवसेनेचा व्हीप मोडला हे रेकॉर्डवर यावं यासाठी सुनील प्रभू यांनी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र दिलं होतं. नरहरी झिरवाळ यांनी सुनील प्रभू यांचं पत्र रेकॉर्डवर घेतल्यानंतर एकनाथ शिंदे समर्थकांकडून देखील सेनेच्या डावाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिलं. राहुल नार्वेकर यांनी गोगावले यांचं पत्र वाचून रेकॉर्डवर घेतलं.
नरहरी झिरवाळ यांनी सुनील प्रभूंचा व्हिप रेकॉर्डवर घेतला
बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या मागणीप्रमाणं नरहरी झिरवाळ यांनी पुढील प्रक्रिया पार पडली. आज माझ्यासमोर महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्ष निवडीची कार्यवाही झाली. मतदानाच्या प्रक्रियेत शिवसेनेच्या सदस्यांनी पक्षाच्या आदेशाविरुद्ध जाऊन मतदान केले, असं माझ्या निदर्शनास आलं आहे. ही प्रक्रिया माझ्यासमोर झाली आहे. माझ्यासमोर मतदानाची प्रक्रिया झाली असून पुढील शिवसेना सदस्यांनी पक्षाच्या आदेशाविरोधात मतदान केल्याचं सिद्ध झालं आहे. या सर्वांचं पक्षाविरोधातील मतदान रेकॉर्डवर घेण्यात यावे आणि त्यांची नाव लिहिण्यात यावीत, या सर्वाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. हे रेकॉर्डवर घ्यावे, असे आदेश देत असल्याचं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं.
गोगावलेंचं राहुल नार्वेकरांना पत्र
शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांचं पत्र नरहरी झिरवाळ यांनी रेकॉर्डवर घेतल्यानंतर भरत गोगावले यांनी राहुल नार्वेकर यांना सेनेच्या १६ सदस्यांनी व्हीप मोडल्याचं पत्र अध्यक्षांना दिलं. ते पत्र राहुल नार्वेकर यांनी वाचून दाखवलं. १६ सदस्यांनी पक्षादेश मोडल्याची नोंद मी घेतली आहे, असं नार्वेकर म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत