करोडो रूपयांची मालकिन असूनही सुधा मुर्ती आपल्या मुलांना पैसे देत नाहीत , काय कारण आहे जाणून घ्या ’ एकल न्यूज़ प्रतिनिधी : आपल्या मुलांना ...
करोडो रूपयांची मालकिन असूनही सुधा मुर्ती आपल्या मुलांना पैसे देत नाहीत , काय कारण आहे जाणून घ्या ’
एकल न्यूज़ प्रतिनिधी : आपल्या मुलांना चांगली शिस्त लावावी, त्यांना चांगल्या सवयी लावाव्यात म्हणून प्रत्येक पालक मेहनत घेतात. पण फार कमी पालक असतात जे आपल्या मुलांना आर्थिक शिस्त लावतात. आता आर्थिक शिस्त म्हणजे काय तर पैश्यांची कदर करणे होय. जी मुले गरिब घरातून येतात, ज्यांना लहानपणापासूनच आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते त्यांना ही सवय आपसूकच लागते. त्यांच्या पालकांना यावर वेगळी मेहनत घेण्याची गरज लागत नाही. पण जी मुले थोडे सधन घरातील असतात वा श्रीमंत घरातील असतात त्यांना मात्र आर्थिक सवयी लावण्याची गरज असते. जर वेळीच त्यांना ही सवय लावली नाही तर मात्र या बाबतीत ते वाईट मार्गाला लागू शकतात.
जर पैश्यांची किंमत नसेल तर त्यांचे भविष्य सुद्धा धोक्यात येऊ शकते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण खुद्द इन्फोसिस फॉंडेशनच्या (infosys foundation) अध्यक्षा सुधा मूर्ती (sudha murthy) यांनी आपल्या मुलांना या सवयी लावल्या आहेत. आता सुधा मूर्ती यांचे कुटुंब किती श्रीमंत आहे हे तुम्हाला वेगळ्याने सांगायला नको. पण त्या कधीच श्रीमंतीचा दिखावा करत नाही आणि मुलांवर सुद्धा तसेच संस्कार त्यांनी केले आहेत हे विशेष!
सुधा मूर्ती या एक स्पीकर आणि लेखिका म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. खास करून कुटुंब व्यवस्था आणि मानवी मुल्ये यांवरचे त्यांचे विचार खूप काही शिकवून जातात. मुलांना मोठे करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि काय काय संस्कार मुलांवर केल्याने मुले एक चांगला व्यक्ती म्हणून घडू शकतात याबद्दल त्या नेहमी पालकांना उपदेश करत असतात. अशाच एका संवादावेळी त्यांनी मुलांना आर्थिक शिस्त लावताना काय गोष्टी कराव्यात आणि काय गोष्टी करू नयेत याबाबत कस टिप्स दिल्या.
मुलांना पैश्यांची लालच देऊ नये
अनेकदा पालक मुलांना म्हणतात की माझं हे काम कर किंवा माझं ते काम कर मग मी तुला एवढे एवढे पैसे देईन. किंवा असा चांगला वाग मग मी तुला एवढे रुपये देईन किंवा बाजारात जा आणि उरलेले पैसे तुला ठेव. तर सुधा मूर्ती यांच्या मते या सगळ्या गोष्टी खुप चुकीचे संस्कार मुलांवर करू शकतात. मुलांना एखाद्या कामासाठी पैसे देणे वा त्याची लालच देणे वाईट असून पैश्यांकडे पाहण्याचा त्यांच्या दृष्टीकोन पूर्णपणे बदलू शकतो असे त्या सांगतात.
सुधा मूर्ती यांचा संदेश
याबाबत पुढे सांगताना सुधा मूर्ती म्हणतात की, पालकानी मुलांच्या मनावर हे बिंबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की पैसा हेच सर्वस्व नाही. पैश्यापेक्षा मोठी मानवी मुल्ये असतात ती आयुष्यभर पाळली पाहिजेत आणि त्यांच्याशी नेहमी बांधील राहिले पाहिजे. जर ह्या आणि अशा गोष्टी मुलांच्या मनावर बिंबवल्या तर एक उत्तम व्यक्ती म्हणून त्यांची जडणघडण नक्की होईल असे सुधा मूर्ती सांगतात.
लॅविश पार्ट्यांपासून ठेवा दूर
सुधा मूर्ती म्हणतात पार्टी करणे ही वाईट गोष्ट नाही. माणसाला एक आनंद हवा असतो, मानसिक सुख हवं असतं आणि पार्टी मधून ते अनेकदा मिळतं. पण त्या पार्ट्यांमध्ये पैश्याची वारेमाप उधळपट्टी नसावी. सुधा मूर्ती म्हणतात लॅविश पार्ट्यांची चटक मुलांना लगेच लागू शकते. ती लागू नये म्हणून मुलांना अशा पार्ट्यापासून दूर ठेवा असा संदेश सुधा मूर्ती देतात. शिवाय अशा पार्ट्या व्यसनाधीन बनवू शकतात अशीही ताकीद त्यांनी दिली.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत