Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

मुंबईत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यानं भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता ?

 मुंबईत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यानं भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता ? मुंबई प्रतिनिधी   : राज्यात जून महिन्यात अपेक्षेप्रमाणं मा...

 मुंबईत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यानं भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता ?


मुंबईत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यानं भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता

मुंबई प्रतिनिधी  : राज्यात जून महिन्यात अपेक्षेप्रमाणं मान्सूनचा पाऊस पडला नाही. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. जून महिन्यात पाऊस न झाल्यानं खरिपाच्या पेरणीवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. राज्यातील एकूण लागवड योग्य जमीनीपैकी केवळी ६० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. जुलै महिन्यात सुरु झालेल्या अतिवृष्ठीचा भाजीपाला शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अतिवृष्टी आणि रस्त्यांची दुरावस्था झाली असल्यानं मुंबईत येणाऱ्या भाजीपाल्यावर परिणाम झाला आहे. भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यानं भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

pitambari


अतिवृष्टीचा फटका


मुंबईला प्रामुख्यानं नाशिक, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून भाजीपाला पुरवठा केला जातो. मात्र, या भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्यानं शेतीचं नुकसान झालं आहे. भाजीपाल्याची आवक देखील घटली आहे.नाशिकहून मुंबईला होणारा भाजीपाला नेहमीच्या प्रमाणात केवळ ३० टक्के होत आहेत. नाशिकमधून मुंबईला येणाऱ्या वाहनांना रस्त्याच्या दुरावस्थेचा सामना करावा लागत आहे, त्यामुळं देखील भाजीपाला पुरठ्यावर परिणाम झाला आहे.

pitambari


भाजीपाल्याचे दर महागले


अतिवृष्टी झाल्यानं मुंबई आणि ठाण्याला होणाऱ्या भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर महागले होते. गेल्या आठवड्यात मुंबईत भेंडी ६० ते ८० रुपये किलो, गवारी ६० ते ८० रुपये, शिमला मिरची ३० रुपये, दुधी भोपळा २५ ते ३० रुपये, वांगी ४० रुपये तर फ्लॉवर ४० ते ६० रुपये किलो प्रमाणं विक्री केली जात होती. तर, या आठवड्यात भेंडीचा दर प्रतिकिलो १०० ते १२०, गवारीचा दर १०० ते १२०, शिमला मिरची ४० ते ५०, दुधी भोपळा ५० ते ६०, वांगी ६० आणि फ्लॉवर ८० रुपये किलोनं विकला जात आहे.

sonai


शेतीला पावसाचा तडाखा


महाराष्ट्रात जून महिन्यात पावसानं मारलेली दांडी आणि जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा शेतीला फटका बसला आहे. जूनमध्ये पाऊस नसल्यानं पेरण्या खोळंबल्या होत्या. आतापर्यंत केवळ ६० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तर, मुंबईसह शहरांना होणाऱ्या भाजीपाला पुरवठा कमी झाला आहे. भाजीपाल्याची आवक घटल्यानं दर महागण्याची शक्यता आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place