Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

बोगस मतदान टाळण्यासाठी महाराष्ट्रात १ ऑगस्टपासून आधार कार्ड हे मतदान कार्डला लिंक अप करण्याचे काम सुरू.

 बोगस मतदान टाळण्यासाठी  महाराष्ट्रात १ ऑगस्टपासून आधार कार्ड  हे मतदान कार्डला लिंक अप करण्याचे काम सुरू.  मुंबई (प्रतिनिधी ) : मतदार याद्य...

 बोगस मतदान टाळण्यासाठी  महाराष्ट्रात १ ऑगस्टपासून आधार कार्ड  हे मतदान कार्डला लिंक अप करण्याचे काम सुरू. 

बोगस मतदान टाळण्यासाठी  महाराष्ट्रात १ ऑगस्टपासून आधार कार्ड  हे मतदान कार्डला लिंक अप करण्याचे काम सुरू ,

मुंबई (प्रतिनिधी) : मतदार याद्यांमधील डबल डबल नावे वगळण्यासाठी निवडणूक आयोगाने (election commission) महत्त्वाची पावले उचलली आहेत.

त्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. येत्या १ ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यामुळे मतदार यादीतील (voters) डबल झालेली नावे वगळता येणार आहेत. शिवाय बोगस मतदानाला आळाही बसणार आहे. मतदान करताना मतदारांना आधार कार्ड (aadhar card) किंवा निवडणूक आयोगाने सांगितलेल्या ११ पैकी कोणताही एक दस्ताऐवज घेऊन जावं लागणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदान करण्याचा हक्क बजावता येणार आहे. मात्र, आधार कार्ड मतदान कार्डाशी संलग्न झाल्यावर मतदारांची माहिती गोपनीय ठेवण्यात येणार आहे. या गोपनीयतेचा भंग झाल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी आज याबाबतची माहिती दिली.यापूर्वी वर्षातून एकदा मतदार नोंदणी केली जायची. आता भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी ही वर्षातून ४ वेळा म्हणजेच १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.

pitambari


     कसे कराल आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी संलग्न? 


आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी संलग्न करण्यासाठी मतदारांना अर्ज क्र. ६ब हा फार्म भरायचा आहे. हा अर्ज सर्व मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये, भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ (https://eci.gov.in/) आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ (https://ceo.maharashtra.gov.in/) येथे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ६ब अर्ज National Voter Service Portal या संकेतस्थळावर आणि Voter Helpline APP यावरही ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध आहे. यावरून अर्ज क्र. ६ब हे आधार कार्ड संलग्न करून स्व-प्रमाणित करता येईल.
हा अर्ज भरताना मतदाराला आधार कार्डाला संलग्न असलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल. मात्र याप्रकारे संलग्नीकरण शक्य झाले नाही किंवा स्व-प्रमाणित करावयाचे नसल्यास, तर केवळ आधार कार्डाची छायांकित प्रत सादर करून स्व-प्रमाणित न करता मतदाराला स्वतःच्या मतदार ओळखपत्र आधारशी संलग्न करता येईल. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (B.L.O) घरोघरी भेटी देऊन अर्ज क्र. ६ब भरून घेतील आणि त्यांचे संगणकीकरण केले जाईल. या मोहिमे अंतर्गत निवडणूक कार्यालयांकडून राज्यव्यापी विशेष शिबिरांचे आयोजनही केले जाणार आहे.मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड यांच्या संलग्नीकरणामुळे मतदारांच्या ओळखीचे प्रमाणीकरण, मतदारांच्या एकापेक्षा अधिक नोंदींची वगळणी केली जाईल. तसेच निवडणूक मतदानासंबंधीची विद्यमान माहिती व आयोगाकडून वेळोवेळी प्रसारित होणाऱ्या सूचना मतदाराला मोबाइलद्वारे अवगत करता येणार आहे.

pitambari


आधार क्रमांक संलग्न करणे ऐच्छिक आहे. त्यामुळे मतदाराकडे आधार क्रमांक नसल्यास नमुना क्र. ६ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना मनरेगा जॉब कार्ड, फोटोसहित किसान पासबुक, आरोग्य स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, एन.पी. आर अंतर्गत आर. जी. आय द्वारा दिले गेलेले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, फोटोसहित पेन्शन कागदपत्रे, केंद्र / राज्य शासन कर्मचाऱ्याचे ओळखपत्र, आमदार / खासदार यांना दिलेले ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र या ११ पर्यायापैंकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल.आधार क्रमांक सादर करता आला नाही तर निकषावर मतदार यादीतील कोणत्याही विद्यमान मतदाराचे नाव वगळले जाणार नाही. तसेच आधार क्रमांक नमूद केलेले प्रत्यक्ष आणि संगणकीकृत दस्तावेज दुहेरी ताळेबंद ठेवले जातील आणि आधार क्रमांकाची गोपनीयता अवाधित ठेवण्यासाठी आधार कार्डावरील क्रमांक लपविण्याची (मास्किंग) तरतूद केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place