Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

४० आमदारांच्या बंडानंतर तसेच काही निवडक खासदारांच्या आग्रहानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत.

  ४० आमदारांच्या बंडानंतर तसेच काही निवडक खासदारांच्या आग्रहानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. मुंबई  प्रति...

 ४० आमदारांच्या बंडानंतर तसेच काही निवडक खासदारांच्या आग्रहानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत.

४० आमदारांच्या बंडानंतर तसेच काही निवडक खासदारांच्या आग्रहानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई  प्रतिनिधी  : एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांच्या बंडानंतर तसेच काही निवडक खासदारांच्या आग्रहानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पक्षातील काही सहकाऱ्यांच्या हट्टानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला १० ते १२ खासदारांचा पाठिंबा असल्याचं वृत्त वरचेवर येत आहे. तसा दावाही एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज सेना खासदारांची बैठक बोलावली आहे. २२ खासदारांपैकी केवळ १२  खासदार 'मातोश्री'ला पोहोचले आहेत. पुढचे तीन तास उद्धव ठाकरे खासदारांची 'मन की बात' ऐकणार आहेत. त्यानंतर ते कदाचित एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊ शकतात, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

sanai doodh


येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. यूपीएकडून यशवंत सिन्हा तर एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याच निवडणुकीत भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी सेनेमधील काही खासदारांची मागणी आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तसं पत्र लिहिलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षातील पडझडीला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे मोठ्या ताकदीने मैदानात उतरले आहेत. आता खासदारांचं म्हणणं ऐकून घेऊन, त्यावर मंथन करुन उद्धव ठाकरे एक पाऊल मागे येऊ शकतात किंबहुना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊ शकतात, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

pitambari


एनडीएमध्ये असूनही दोनवेळा शिवसेनेने यूपीएच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. २००७ साली प्रतिभा ताई पाटील आणि नंतर प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला. अजून तरी शिवसेना राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आहे तसेच २ वर्षांपूर्वीच शिवसेना एनडीएमधूनही बाहेर पडली आहे. युती-आघाडी न बघता उमेदवार पाहून पाठिंबा देण्याचा शिवसेनेचा मागील इतिहास आहे. द्रौपदी मुर्मू यांची पार्श्वभूमी व सामाजिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेता शिवसेना पाठिंबा देऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place