Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

नवीन घर खरेदी केलं असेल किंवा तुमच्या घराचे रूप पालटण्याचा विचार करत असाल तर हा प्रश्न खास तुमच्यासाठी;

  नवीन घर खरेदी केलं असेल किंवा तुमच्या घराचे रूप पालटण्याचा विचार करत असाल तर हा प्रश्न खास तुमच्यासाठी; एकल न्यूज़ : घरांना घरपण देण्यासाठी...

 नवीन घर खरेदी केलं असेल किंवा तुमच्या घराचे रूप पालटण्याचा विचार करत असाल तर हा प्रश्न खास तुमच्यासाठी;

नवीन घर खरेदी केलं असेल किंवा तुमच्या घराचे रूप पालटण्याचा विचार करत असाल तर हा प्रश्न खास तुमच्यासाठी;
एकल न्यूज़ : घरांना घरपण देण्यासाठी एक वेगळीच मेहनत लागते हे आपण सर्व जाणतोच. घरात फर्निचर कोणतं ठेवायचं, भिंतींना रंग कोणता असावा, फ्लोरिंग कोणत्या टाईपची असावी इथपासून ते आपल्याला हवी असलेली सिलिंग शोधण्यासाठी जंग जंग पछाडण्यापर्यंतच्या मेहनतीचा प्रवास म्हणजे घराला घरपण देणं होय आणि हेच घर तुमचं खरं प्रतिबिंब दर्शवत असतं.
pitambari


आपल्यापैकी अनेकजण घर रिनोव्हेशन म्हणजेच घराचं नुतनीकरण करण्यास नापसंती दर्शवतात कारण ही खूप वेळखाऊ प्रक्रिया असते आणि दगदग देणारी सुद्धा, पण जर तुमच्याकडे योग्य नियोजन आणि क्रियेटीव्ह इंटेरियर डिजाईन आयडियाज असतील तर तुम्ही स्वप्नमयी घर सजवू शकता. इंटेरियर करताना तुमच्या गरजा, तुमच्या इच्छा आणि बजेट या गोष्टी जरी महत्वाच्या असल्या तरी या प्रक्रीयेमध्ये अजून असे काही घटक असतात ज्याकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्यायला हवे कारण हे घटक तुमच्या सुंदर घराची वैशिष्ट्ये असतात. सामान्यत: सिलिंगच्या कामावर फार कोणी जास्त लक्ष देत नाही. घर सजवताना लोकांचा कल हा भिंती आणि फरशी अधिकाधिक सुंदर कशी दिसेल याकडे असतो. या गोष्टींप्रमाणे सिलिंग सुद्धा तुमच्या घराचे सौंदर्य खुलवण्यास मदत करते. खरंतर सिलिंगच ती गोष्ट असते जी तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्याला थक्क करू शकते आणि तुमच्या घराचं ठळक वैशिष्ट्य ठरू शकते. पण आजकाल उर्वरित घर सजवण्यावर जास्त भर देऊन लोकं डिजाईनर फॉल्स सिलिंगच्या पर्यायाला दुर्लक्षित करू लागले आहेत.
नवीन घर खरेदी केलं असेल किंवा तुमच्या घराचे रूप पालटण्याचा विचार करत असाल तर हा प्रश्न खास तुमच्यासाठी;


तर मंडळी तुम्हीही नवीन घर खरेदी केलं असेल किंवा तुमच्या घराचे रूप पालटण्याचा विचार करत असाल तर हा प्रश्न खास तुमच्यासाठी आहेत -

इंटेरियर आकर्षक दिसण्यामध्ये सिलिंगची भूमिका महत्त्वाची असते. सध्याच्या काळात बिल्डर्स/रियल इस्टेट डेव्हलपर्स आणि आर्किटेक सुद्धा डिजाईनिंगच्या सुरुवातीपासूनच ‘डिजाईनर फॉल्स सिलिंग’ अधिकाधिक सुंदर करण्यावर विशेष भर देतात. आता तर हळूहळू ज्यांची जुनी घरे आहेत ते सुद्धा आपल्या घराच्या रिनोव्हेशन वेळी ‘डिजाईनर सिलिंगची’ मागणी करू लागले आहेत.

amul


एक घरमालक म्हणून घराच्या रचनेच्या दृष्टीने इंटेरियर पुन्हा डिजाईन करण्याची कल्पना काहीशी महागडी वाटू शकते. पण सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे सिलिंग रिडिजाईनिंग करण्याचे काम तुमचा खिसा अजिबात कापत नाही. पण हे काम सर्वोत्तम व्हावे यासाठी विश्वासू कंपनीकडेच तुम्ही ही जबाबदारी सोपवायला हवी. जीप्रॉक सारख्या (सेंट गोबेनचाच एक भाग) ब्रँड्सकडे तुमच्या इच्छेनुसार, बजेटनुसार आणि लवकरात लवकर काम व्हावे या मागणीनुसार सिलिंग डिजाईन्सचे संपूर्ण वेगळे कॅटलॉग आहेत. ज्यातून तुम्ही केवळ 7* दिवसांमध्ये तुमच्या सिलिंगचे रुपडे पालटू शकता. जीप्रॉक ही कंपनी सेंट-गोबेन समुहाचा (2019 मध्ये तब्बल €42 बिलियनची विक्री) एक भाग असून, जगातील अग्रगण्य सिलिंग, ड्रायवॉल्स आणि जिप्सम प्लास्टर उत्पादक म्हणून त्यांची ख्याती आहे. कंपनीला माहित आहे की सिलिंग हा घराचा अविभाज्य भाग आहे आणि त्याच्या डिजाईन संकल्पनेपासून, त्याप्रमाणे ते घडवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीशी एक भावना जोडलेली असते. जीप्रॉकनेच या सेवेची सुरुवात केली होती आणि गेल्या दशकभरापासून आपल्या विश्वासाच्या आणि प्रामाणिकतेच्या जोरावर हा ब्रँड ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू फुलवत आहे. तर मग जेव्हा कधी सिलिंगला नवं रूप द्यावंस वाटेल तेव्हा हक्काने जीप्रॉकची साथ निवडा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place