बदलापुर मध्ये MSEB च्या दुर्लक्ष्यमुळे , जुन्या झालेल्या विजेच्या तारा, अंगावर कोसळून गुरेचरासह,तीन म्हशीचा जागीच मृत्यू.. बदलापुर प्रतिनिधी...
बदलापुर मध्ये MSEB च्या दुर्लक्ष्यमुळे , जुन्या झालेल्या विजेच्या तारा, अंगावर कोसळून गुरेचरासह,तीन म्हशीचा जागीच मृत्यू..
बदलापुर प्रतिनिधी : चेंबुरकर वाडीत आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास, वीजेची तार तुटून एक गुरचर आणि तीन म्हशिंचा जागीच मृत्यू झाला ,या घटनेमुळे पंचोकृषित स्मशान शांतता पसरली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.पावसाच्या दिवसात नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊन बाहेर पडावे हेच अगत्याचे झाले आहे....
ठळक वार्ताचे पत्रकार आदर्श तायडे यांनी या घटनेची प्रत्यक्ष पाहणी करून, घटना स्थळावरून माहिती घेतली आहे.यावेळी त्यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांना निर्वाणीचा इशारा दिला असून, लवकर या घटनेचा पंचनामा करून पीडितांना न्याय द्यावा,तसेच जुन्या विजवाहिण्या बंद करून त्याची नव्याने उभारणी करावी असे देखील सुचवले.
यावेळी साई गावचे विद्यमान सरपंच राजू भोपी, यांनी,"जर येत्या पंधरा दिवसात MSEB च्या अधिकाऱ्यांनी नवीन विजेचे खांब आणि विजवहिण्या या ठिकाणी बसवल्या नाही, तर स्वतः जेसीबी घेऊन विजेचे खांब तोडून उकरून काढू ",असे म्हणत तीव्र संताप व्यक्त केला असून, या वेळी उपसरपंच संदीप जाधव व स्वतः ठळक वार्ता चे संपादक कैलास जाधव व रोशन ठाणगे,विनोद भोपी आणि गावकरी उपस्थित होते,






कोणत्याही टिप्पण्या नाहीत