Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

मेधा सोमय्या प्रकरणात अखेर कोर्टाने राऊत यांना ६ ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे दिले निर्देश....

 मेधा सोमय्या प्रकरणात अखेर कोर्टाने राऊत यांना ६ ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे दिले निर्देश ...... मुंबई प्रतिनिधी : आमदार, खासदारांसह ...

 मेधा सोमय्या प्रकरणात अखेर कोर्टाने राऊत यांना ६ ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे दिले निर्देश ......

मेधा सोमय्या प्रकरणात अखेर कोर्टाने राऊत यांना ६ ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे दिले निर्देश

मुंबई प्रतिनिधी : आमदार, खासदारांसह पक्षाच्या विविध नेत्यांनी बंडाची भूमिका घेतल्याने शिवसेना सध्या ऐतिहासिक संकटात सापडली आहे. अशा स्थितीतही काही मोजके सहकारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतीने पक्षाच्या अस्तित्वासाठी निकराची लढाई लढत आहेत. यामध्ये शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे आघाडीवर आहेत. मात्र याच राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

pitambari


भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीच्या प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना ६ ऑगस्ट रोजी म्हणणे मांडण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश शिवडी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी दिले आहेत.

pitambari


'सोमवारपासून (१८ जुलै) संसदेचे अधिवेशन सुरू झाले असून ते १३ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे तोपर्यंत न्यायालयात गैरहजर राहण्याची मुभा द्यावी आणि पुढील सुनावणी सप्टेंबरमध्ये ठेवावी', अशी विनंती संजय राऊत यांनी सोमवारी वकिलांमार्फत केली. त्याला मेधा यांच्यातर्फे अॅड. विवेकानंद गुप्ता यांनी तीव्र विरोध दर्शवला. 'शनिवार व रविवारी संसदेचे अधिवेशन नसते आणि बहुतांश खासदार हे आपल्या मूळ ठिकाणी जात असतात. त्यामुळे शनिवारी सुनावणी ठेवून राऊत यांना हजर राहण्यास सांगितले जाऊ शकते,' असे म्हणणे त्यांनी मांडले होते. अखेर कोर्टाने राऊत यांना ६ ऑगस्ट रोजी म्हणणे मांडण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place