राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती महोत्सव जल्लोषात साजरा.. नाशिक प्रति...
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती महोत्सव जल्लोषात साजरा..
नाशिक प्रतिनिधी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती महोत्सव अतिशय जल्लोषात, उत्साहात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ( नाशिक, मुंबई, पुणे, अहमदनगर, ठाणे, धुळे, तसेच विविध ठिकाणी) साजरा करण्यात आला. अशोक स्तंभ चौक पंचशील नगर, नाशिकरोड नाशिक येथे एका कार्यक्रमाच्या दरम्यान राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी प्रामुख्याने साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे विचार आत्मसात करा असे जनतेला संबोधित केले.
तसेच शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा अशी मागणी देखील या कार्यक्रमाच्या दरम्यान अण्णासाहेब कटारे यांनी केली. या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे हे उपस्थित होते.सोबतच प्रभागाचे नगरसेवक राहूल भाऊ दिवे, आंबेडकरी चळवळीतील नेते दिलीप काका प्रधान, युवा नेते बिपीन अण्णासाहेब कटारे,प्रशांत कटारे, निवृत्त पोलीस निरीक्षक बस्ते साहेब,नितीन भाऊ गांगुर्डे, घोडे दादा, युवा नेते कुणाल गांगुर्डे
आदी महिला,युवा,उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत