श्री राम सेना हिंदुस्थानचे पदाधिकारी उद्धवजी यांच्या पाठीशी प्रतिनिधी मुंबई -: मराठी भाषिकांवरील अन्याया विरोधात आवाज उठवत सीमा भागात...
श्री राम सेना हिंदुस्थानचे पदाधिकारी उद्धवजी यांच्या पाठीशी
प्रतिनिधी मुंबई -: मराठी भाषिकांवरील अन्याया विरोधात आवाज उठवत सीमा भागातील मराठी माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी श्री राम सेना हिंदूस्थान संघटना बेळगाव तसेच महाराष्ट्र एकीकरण समिती चे प्रमुख पदाधिकारी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बुधवारी मातोश्री वर सदिच्छा भेट घेतली.
मंगळवारी सीमा प्रश्नावर आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी समिती मुंबईत आले होते त्यावेळी त्यांनी मातोश्री मुक्कामी उद्धवजी यांची भेट घेतली.
श्रीराम सेना हिंदूस्थान संघटनेचे संघटक प्रमुख चंद्रकांत कोंडूसकर बेळगाव यांनी काही निवडक कार्यकर्त्या सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समर्थन देत शिवसेनापक्ष प्रवेश केला. प्रसंगी पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांस शिव बंधन बांधून पक्ष प्रवेश देत स्वागत करत जोमाने काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सीमाभागातील सद्यस्थिती जाणुन घेतली व सीमा भागातील मराठी बांधवांच्या सोबत असून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.सीमा भागात होत असणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात लढा अधिक बळकट करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत भविष्यात जोमाने काम करणार असल्याचे सांगितले.



.jpeg)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत