लोकसभेपर्यंत शरद पवारांनीच राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं; पक्षाच्या आजच्या बैठकीत ठराव होण्याची शक्यता मुंबई प्रतिनिधी - शरद पवारयांनी राष्ट...
लोकसभेपर्यंत शरद पवारांनीच राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं; पक्षाच्या आजच्या बैठकीत ठराव होण्याची शक्यता
मुंबई प्रतिनिधी - शरद पवारयांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं दिसून येतंय.त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवारांनी पक्षाचे नेतृत्व करावे असा ठराव आज होणाऱ्या बैठकीत येण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.
शरद पवार हे लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्षाचे अध्यक्ष राहतील याला सर्व निमंत्रित सदस्यांची तत्वत: अनौपचारिक मान्यता असेल अशी माहिती आहे. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली दुसरं एखादं पद तयार केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आज होणाऱ्या बैठकीकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 2 मे रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शरद पवारांनी अचानक घेतलेल्या या निर्णयानंतर राज्यभरातील नेते आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली तर अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहून शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती केली आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत