ठाणेकरांसमोर पुन्हा पाणीकपातीचं संकट, शहरातील अनेक भागांत 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद मुंबई प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून राज्...
ठाणेकरांसमोर पुन्हा पाणीकपातीचं संकट, शहरातील अनेक भागांत 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद
मुंबई प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या तापमानात मोठी वाढ होत असतानाच ठाण्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाणे महानगरपालिकेने राबोडी परिसरात पुल बांधणीचं काम हाती घेतलं आहे.त्यामुळं येत्या शनिवारी ठाण्यातील अनेक भागांमध्ये २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील अनेक भागांमध्ये पाणीकपात करण्यात आली होती, त्यानंतर आता ऐन उन्हाळ्यात पुन्हा ठाण्यात पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्यामुळं ठाणेकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे.
ठाण्यातील राबोडीच्या के-व्हीला भागातील पुल बांधणीच्या कामात ५०० मीमी व्यासाची जलवाहिनीची अडचणीची ठरत आहे. त्यामुळं पालिकेने ही जलवाहिनी दुसरीकडे स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं पालिकेकडून जलवाहिनी स्थलांतर करण्याचं काम हाती घेण्यात आलं असून त्यामुळं शनिवारी शहरातील अनेक भागात होणार पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
रविवारी दुपारपासून शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे जेल, आरटीओ परिसर, कॅसल मिल, श्रीरंग सोसायटी परिसर, राबोडी १, राबोडी २, पंचगंगा, आकाशगंगा, केव्हीला परिसर, पोलीस वसाहत, टेंभीनाका, धोबी आळी आणि उथळसर या परिसरातील पाणीपुरवठा बाधित होणार आहे. त्यामुळं आता उन्हाळ्यात आधीच पाणीकपातीचा सामना करत असलेल्या ठाणेकरांना आणखी काही दिवस पाण्याची बचत करावी लागणार आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत