नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे साहेब यांना राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे निवेदन सादर🔹 नाशिक (प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्र...
नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे साहेब यांना राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे निवेदन सादर🔹
नाशिक (प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यासह देशातील समस्त शासकीय कार्यालये त्यातही प्रामुख्याने सर्व पोलिस स्टेशन, पोलिस मुख्यालयं, न्यायालयं येथे तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या मुर्तीची स्थापना करण्यात यावी अश्या मागणी चे निवेदन सादर करण्यात आले यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते गिरीश जी अकोलकर सर,युवा नेतृत्व बिपीन अण्णासाहेब कटारे,नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितू भाऊ बागुल,नाशिक शहराध्यक्षा रेश्माताई बच्छाव,युवा नेते हेमंत भाऊ आहेर,प्रशांत शिंदे उपस्थित होते.
देशांतर्गत वाढती महागाई, बेरोजगारी, उत्पन्नांत होत असलेली घट यामुळे देशासह राज्यात सर्वस्तरावरील जनतेचे दैनदिन जीवन जिकरीचे झाले आहे,,सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असून वाढत्या गरजा भागवता भागवता सामान्य जनतेच्या मानसिक संतुलना वरही विपरीत परिणाम होत आहे, याचाच परिणाम त्यांच्या सामाजिक व कौटुंबिक वागणुकीवर पडतांना दिसत आहे.
देशासह राज्यात जाती - धर्मातील वाढता द्वेष व त्यास खतपाणी घालणारी असामाजिक तत्व यांचा प्रभावही वाढत आहे.
या सर्व परिस्थितीमुळे देशातील जनता असुरक्षिततेच्या वातावरणात जगत आहे, देशासह राज्यात वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार, धार्मिक व सामाजिक दहशदवाद, असिहिष्णुता, असंवैधानिक वर्तन, व्यभिचार, अत्याचार या सारख्या गुन्हेगारी वृत्ती वाढत्या आकड्यावरुन सिध्दचं होते.
आपल्या देशाचे संविधान सर्वधर्म समभाव ( निधर्मी ) राष्ट्रवादाचे जगातील एकमेव पुरस्कर्ते म्हणून जगभरात सन्मानाने गौरवान्वित आहे, अशा आपल्या देशाला थोर विचारवंत, समाजसुघारक, क्रांतिकारी, संतांच्या समृध्द जीवन मुल्यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. या सर्व श्रेणीत सामान्य जनतेचे सामाजिक, कौटुंबिक जीवन संतुलित, स्थिर व अप्रवृत्तीं पासून स्वत:ला सुरक्षित करण्याचा मार्ग सांगणारे, विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुध्द यांनी सांगितलेल्या पाच सुत्रांची, शपथा समस्त मानव जातीने अंगिकारणे व दैनदिन जीवनात त्यांचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न करणे हिच काळाची, आजची खरी गरज आहे.
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळापासून देशातील राजकीय, सामाजिक विचारधारा आपला देश गौतम बुध्दांचा देश आहे, त्यांच्या मार्गदर्शक तत्वांवर चालणारा देश आहे हे जगाला वारंवार अभिमानाने सांगत आले आहेत व जगानेही संघर्ष व वर्चस्वाच्या नितीचा त्याग करून भगवान बुध्दांचा मार्ग अवलंबवावा यासाठी आग्रही मत मांडत असतात. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष या भूमिकेचे सन्मानपूर्वक नेहमीच स्वागत करते.
विश्वशांतीसाठि वैद्यानिक प्रगतीसाठि आपल्या देशाने केलेल्या पहिल्या अणूचाचणीच्या य़शस्वी चाचणीचा परवलीचे ( Code Word) वाक्य " आणि बुध्द हसला " हे असो वा नुकत्याच जपान दौ-यात भारतीय समुदायाला संबोधित करतांनाही जगाने भगवान गौतम बुध्दांचा मार्ग स्विकारला पाहीजे असे विश्वाशी व ठाम मत व्यक्त करणारे आपले माननीय पंतप्रधान नरेंन्द्रजी मोदी असोत, जागतिक समुदायही भगवान गौतम बुध्दांच्या मार्गदर्शक तत्वांचा सन्मानाने स्विकार करतो व अनुसरण करण्यास प्रतिसादही देतो.
विश्वशांती आणि मानवी जीवन सुखकारक होण्यासाठि भगवान बुध्द जे मार्ग सांगतात / शपथ घेण्यास सांगतात
ते असे :
१. मी, जीवहिंसेपासून अलिप्त राहीन
२. मी, चोरी करण्यापासून अलिप्त राहीन
३. मी, कामवासनेपासून अलिप्त राहीन
४. मी, खोटे बोलण्यापासून अलिप्त राहीन
५. मी, मद्य, मादक पदार्थ, व्यसन करण्यापासून अलिप्त राहीन.
हिंसा, खोटेपणा, चोरी, कामवासना, व्यभिचार, व्सनाधिनता, द्वेष, मत्सर ही मानवी जातीला लागलेली वर्चस्वाच्या स्पर्धेतली किड आहे आणि हीच किड समस्त गुन्हेगारी प्रवृत्तीचे मुळ आहे. या किडी पासून समस्त भारतीयांना दूर रहाण्याची प्रेरणा भगवान गैतम बुध्दांच्या नित्य स्मरणातून, दर्शनातून मिळते हा आपणां भारतीयांचा अनूभवचं नाही तर शाश्वत सत्य आहे.
देशात व राज्यात विद्यमान परिस्थितीमुळे जनसामांन्यांना मानवी जीवन मुल्यांतून सर्वांगिण विकास साधून गुन्हेगारी, असामाजिक तत्व यावर विजय.प्राप्त करण्यासाठि भगवान गौतम बुध्दांनी सांगितलेली पाच तत्व सर्व भारतीयांच्या कायम स्मरणात रहावी व त्यांचे विचार, व्यवहार यात शुध्दता यावी तसेच ज्या व्यक्ति नितिमत्तेनी वागतात त्यांना अधिक बळ प्राप्त व्हावे याकरीता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आग्रही मागणी करीत आहे.


.jpeg)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत