आमदार स्वखुशीने माझ्यासोबत,आम्ही कोणाचंही अपहरण केलेलं नाही आमदार : एकनाथ शिंदे मुंबई प्रतिनिधी : हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या ...
आमदार स्वखुशीने माझ्यासोबत,आम्ही कोणाचंही अपहरण केलेलं नाही आमदार : एकनाथ शिंदे
मुंबई प्रतिनिधी : हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपैकी काहीजणांना करण्यात आल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपाला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतसाहेब आमचे नेते आहेत. मात्र, आमदारांना मारहाण झाल्याचा कुठलाही प्रकार घडलेला नाही. माझ्यासोबत असलेल्या आमदारांवर कोणतीही जोरजबरदस्ती करण्यात आलेली नाही. आम्ही सर्व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे असल्याने एकत्र आलो आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे गटाचे तब्बल ४० आमदार बुधवारी सकाळी सूरतमधून गुवाहाटीमध्ये दाखल झाले. याठिकाणी त्यांना हॉटेल रॅडिसनमध्ये ठेवण्यात आले आहे. गुवाहाटीत आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट करायला सुरुवात केली. स्वत: एकनाथ शिंदे यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्याकडे सध्याच्या घडीला ४५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. हा आकडा दुपारपर्यंत आणखी वाढेल, अशी शक्यताही शिंदे गटातील आमदारांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार कोसळणार हे जवळपास निश्चित झाले असून या सरकारची उलटगणती सुरु झाल्याचे बोलले जात आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत