Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Grid

GRID_STYLE

Effects

TRUE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking News:

latest

Ads Place

राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायतच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा घेतला निर्णय.

राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायतच्या निवडणुका  पुढे ढकलण्याचा घेतला निर्णय. मुंबई प्रतिनिधी   : राज्य निवडणूक आयोगाने राज्...

राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायतच्या निवडणुका  पुढे ढकलण्याचा घेतला निर्णय.


राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायतच्या निवडणुका  पुढे ढकलण्याचा घेतला निर्णय.

मुंबई प्रतिनिधी  : राज्य निवडणूक आयोगाने राज्यात होऊ घातलेल्या 92 नगरपरिषदा  व चार नगरपंचायत  यांच्या निवडणुका  पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.राज्य निवडणूक आयोगाचे सचिव संजय सावंत यांनी आज एका पत्राद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली आहे. 

sonai


या पत्रात नमूद केले आहे की, 8 जुलै रोजी राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायत पंचायतीच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात आली होती आणि 12 जुलै रोजी त्याची सुनावणी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला.

pitambari


सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी 19 जुलै रोजी ठेवलेली आहे. या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने 8 जुलै रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेला राज्यातील 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. सदर निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल. असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नगरपरिषद व नगरपंचायत यांच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Ads Place